AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: मोठी बातमी! वैभव सूर्यवंशी ज्युनिअर विश्वकपमधून आऊट? चाहत्यांना मोठा धक्का, कारण तरी काय?

Vaibhav Suryavanshi : धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी हा ज्युनिअर विश्वकप खेळणार नाही का, असा सवाल केल्या जात आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काय आहे ती क्रिकेट जगतामधील मोठी अपडेट?

Vaibhav Suryavanshi: मोठी बातमी! वैभव सूर्यवंशी ज्युनिअर विश्वकपमधून आऊट? चाहत्यांना मोठा धक्का, कारण तरी काय?
वैभव सूर्यवंशीImage Credit source: गुगल
| Updated on: Jan 16, 2026 | 8:38 AM
Share

Vaibhav Suryavanshi : टीम इंडिया इंडियाने अंडर–19 विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली आहे. भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे अमेरिकेला 6 गड्यांनी मात दिली. या सामन्यात टीम इंडियाच नाही तर धडाकेबाज खेळाडू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) या सामन्यात मोठी कामगिरी करु शकला नाही. वैभव अवघे दोन धावा काढून तंबूत परतला. पुढील सामन्यात त्याने तुफान फटकेबाजी करावी अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. वैभवचा हा पहिला आणि शेवटचा टी20 विश्वचषक आहे. पुढील दोन वर्षानंतर तो 16 वर्षांचा होईल. वय कमी असल्यावर सुद्धा त्याला या विश्वचषकात सलामी देता येणार नाही.

पुढील विश्वचषकात दिसणार नाही

वैभव सूर्यवंशी पुढील वेळी ज्युनिअर विश्वकप खेळू शकणार नाही. चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे. त्यामागे BCCI ने बदलेला नियम आहे. या नियमानुसार, आता कोणताही खेळाडू अंडर-19 च्या एकाच हंगामात खेळू सकतो. तर विश्वचषक वगळता देशांतर्गत कोणताही खेळाडू दोन हंगामांपेक्षा जास्त काळ ज्युनिअर संघाचे प्रतिनिधीत्वही करू शकत नाही, असा या नियमाने स्पष्ट केले आहे.

का घेतला असा निर्णय?

BCCI च्या या निर्णयावर सध्या चर्चा सुरू आहे. जर एखादा क्रिकेटर अंडर-19 विश्वचषकात खेळला तर पुढील वेळा त्याला खेळण्याचा काही अर्थ नाही. त्याला जो काही प्रभाव दाखवायचा, जी काही कामगिरी दाखवयची ती त्याने याच एका हंगामात दाखवावी असे मत व्यक्त होत आहे. तर ज्युनिअर अंडर-19 विश्व चषक हा दोन वर्षांच्या अंतराने खेळला जातो. तर घरगुती 19 वर्षाखालील सामन्यातही हे दिग्गज फलंदाज खेळतात. त्यामुळे या खेळाडूंना अंडर-19 विश्वचषकात स्थान मिळण्याचे गणित पक्कं होतं. तर एखाद्या गुणी खेळाडूला पण मोठी संधी मिळते.

हे खेळाडू दोनदा खेळले

भारतीय क्रिकेट इतिहासात कोणताच खेळाडू दोन पेक्षा अधिक म्हणजे तीन वेळा अंडर-19 विश्वचषक खेळलेले नाहीत. पण ज्युनिअर विश्वचषकासाठी दोनदा खेळणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या खेळाडूमध्ये रवींद्र जडेजा, आवेश खान, रिकी भुई, सरफराज खान, विजय झोल, रितींद सिंह सोढी, मोहम्मद कैफ आणि अभिषेक शर्मा यांचा समावेश आहे.  हजारे करंडकात वैभवने चांगली कामगिरी बजावली. त्यानंतर त्याचा फॉर्म दिसला नाही. तर मागील सामन्यात त्याला सूर गवसल्याचे दिसून आले.  पण तो आता पुढील अंडर–19 विश्वचषक खेळू शकणार नाही.

मुंबईचा फैसला आज होणार; ठाकरेंच्या हातून सत्ता जाणार?
मुंबईचा फैसला आज होणार; ठाकरेंच्या हातून सत्ता जाणार?.
महायुती की ठाकरे बंधू? मुंबईचा एक्झिट पोल काय? पाहा व्हिडीओ
महायुती की ठाकरे बंधू? मुंबईचा एक्झिट पोल काय? पाहा व्हिडीओ.
मुंबईत ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला! काय लागणार निकाल?
मुंबईत ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला! काय लागणार निकाल?.
महापालिका निवडणूकीत कोण मारणार बाजी?पाहा लाईव्ह निकाल टीव्ही 9 मराठीवर
महापालिका निवडणूकीत कोण मारणार बाजी?पाहा लाईव्ह निकाल टीव्ही 9 मराठीवर.
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ.
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल.
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका.
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर...
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर....
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी.
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप.