Video : टीम इंडियाच्या ‘या’ माजी कॅप्टनसोबत लग्न करायला आवडेल’; प्रियंका चोप्राचं मोठं वक्तव्य

बॉलिवूड आणि क्रिकेटर्स यांच्या अनेक जोड्या आपण पाहिल्या आहेत. विराट-अनुष्का, हरभजन सिंहसह अनेक खेळाडूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्न केलं आहे. बॉलिुवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राने भारताच्या माजी कर्णधाराचं नाव घेत त्याच्यासोबत लग्न करायला आवडेल असं म्हटलं. कोण आहे तो खेळाडू व्हिडीओमध्ये पाहा.

Video : टीम इंडियाच्या या माजी कॅप्टनसोबत लग्न करायला आवडेल; प्रियंका चोप्राचं मोठं वक्तव्य
| Updated on: Aug 23, 2024 | 6:19 PM

बॉलिवूडमध्येच नाहीतर हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राने वेगळी ओळख निर्माण केली. प्रियंका सोशल मीडियालवर आपल्या पोस्टमुळे कायम चर्चेत असलेली पाहायला मिळते. प्रियंकाने वयाच्या18 व्या वर्षी मिस इंडिया रनरअप आणि मिस वर्ल्ड वर्ल्डचा किताब पटकावला होता. प्रियंकाने 2018 ला हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्न केलं. पण प्रियंका चोप्राने एका भारतीय क्रिकेटरसोबत लग्न करणार असं म्हटलं होतं. कोण होता तो क्रिकेटर जाणून घ्या.

प्रियंका चोप्रा हिने 2000 साली मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान हा न्यायाधीशांच्या पॅनलमध्ये होता. त्यावेळी शाहरूखने प्रियंकाला एक प्रश्न विचारला होता. ज्यामध्ये त्याने म्हटलं होतं की मी प्रियंकाला एक काल्पनिक प्रश्न विचारणार असून त्यासाठी तिला पर्याय देणार आहे. या तीन पर्यायांमध्ये एक प्रियंकाला निवडावा लागणार आहे.

तुला कोणत्या व्यक्तिसोबत लग्न करायला आवडेल? असा प्रश्न तिला शाहरूखने केला होता. यासाठी पहिला पर्याय म्हणजे एक भारतीय खेळाडू या कार्यक्रमात अजहरुद्दीनसारखा आहे. जो तुला जगभर फिरवेल आणि ज्याला तुला आणि देशाचा अभिमान वाटेल. तर दुसरा पर्याय, स्वारोवस्की सारखे व्यावसायिक, जो तुम्हाला दागिने आणि हार खरेदी करेल. तिसरा पर्याय म्हणजे, माझ्यासारखा हिंदी चित्रपट स्टार यामधील कोणाची निवड करशील?

प्रियंका चोप्रा हिने या तीन पर्यायांपैकी क्रिकेटर अजहरची निवड केली. प्रियंका म्हणाली की, मला भारतीय खेळाडू अझहरसोबत लग्न करायला आवडेल. सगळ्या देशाला अभिमान असेल असा माझा नवरा असेल तर मलाही अभिमान वाटेल. त्यावेळी सर्वांना वाटलं होतं की प्रियंका शाहरूखच्या पर्यायाची निवड करेल. मात्र, तसं काही झालं नाही. प्रियंका चोप्रा आणि शाहरूख खान यांनी डॉन आणि डॉन 2 या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यावेळी दोघांच्या अफेरचीही जोरदार चर्चा सुरू होत्या.