AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, PBKS vs CSK, Orange Cap : ऑरेंज कॅपवर बटलर’राज’ कायम, कोणत्या खेळाडूने केली आगेकूच, जाणून घ्या

आयपीएलच्या  पंधराव्या सीजनमधील काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर पंजाबने विजय मिळवलाय. यानंतर ऑरेंज कॅपमध्ये काय बदल झाले आहेत. पाहुया

IPL 2022, PBKS vs CSK, Orange Cap : ऑरेंज कॅपवर बटलर'राज' कायम, कोणत्या खेळाडूने केली आगेकूच, जाणून घ्या
ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये जॉस बटलर अव्वलImage Credit source: twitter
| Updated on: Apr 26, 2022 | 7:16 AM
Share

मुंबई: आयपीएलच्या  (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील काल म्हणजेच सोमवारी झालेल्या पंजब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या (PBKS vs CSK) सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. पंजाबने हा सामना 11 धावांनी जिंकला. पंजाबचा आयपीएलमधील हा चौथा विजय आहे. पंजाबच्या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफचा (Play off) मार्ग अधिक खडतर बनला आहे. चेन्नईने आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये ते नवव्या स्थानावर आहेत. पंजाबच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकात सहा बाद 176 धावा केल्या. अंबाती रायुडूची 39 चेंडूतील 78 धावांची खेळी व्यर्थ ठरली. यात सात चौकार आणि सहा षटकार होते. दरम्यान, कालच्या सामन्यातील पंजाबच्या विजयाने चेन्नईचा प्लेऑफचा मार्ग अधिक खडतर बनला आहे. कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत बदल झाले आहेत का?, पाहुया

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

ऑरेंज कॅपच्या लिस्टमध्य्ये पहिल्या क्रमांकावर जोस बटलर आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 491 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आहे. त्याने 368 धावा या सीजनमध्ये केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहे. त्याने आतापर्यंत 302 धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्या हा चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 295 धावा केल्या आहेत. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर तिलक वर्मा आहे. त्याने 272 धावा केल्या आहेत.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

इतर बातम्या

Osmananbad : कृषी योजनांची पूर्तता, 3 कोटी बक्षीस अन् शेत शिवाराचं रुपडं बदलण्यासाठी राबतंय जिल्हा प्रशासन

William Shakespeare Birth Anniversary: शेक्सपियरबद्दल असं म्हटलं जातं, कोणतं अमृत पिऊन आलेला म्हणून तो अमर झाला आहे; असं का विचारलं जातं, वाचा सविस्तर…

Maharashtra News Live Update : पालघरच्या शिक्षणाधिकारी लत्ता सानप यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडलं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.