William Shakespeare Birth Anniversary: शेक्सपियरबद्दल असं म्हटलं जातं, कोणतं अमृत पिऊन आलेला म्हणून तो अमर झाला आहे; असं का विचारलं जातं, वाचा सविस्तर…

महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Apr 26, 2022 | 6:30 AM

विल्यम शेक्सपियर फक्त आजच वाचतात असं नाही आजही आणि उद्याही वाचत असणारच. त्याचे साहित्य जुने झाले आहे का तर अजिबात नाही, आणि त्याचे साहित्य पाश्चात्य आहे का तर त्याचेही उत्तर नाहीच असं आहे, कारण शेक्सपियर हा माणूस आणि लेखक म्हणून साऱ्या जगाने स्विकारला आहे. म्हणून आजही त्याच्या साहित्यावर कादंबऱ्या येतात, नाटकं येतात आणि चित्रपटही येतात, म्हणून तो अमर आहे ते याच कारणासाठी...

William Shakespeare Birth Anniversary: शेक्सपियरबद्दल असं म्हटलं जातं, कोणतं अमृत पिऊन आलेला म्हणून तो अमर झाला आहे; असं का विचारलं जातं, वाचा सविस्तर...
william shakespeare
Image Credit source: Twitter

मुंबईः साहित्याच्या क्षेत्रात आपल्या कलाकृत्तीनी जी माणसं अमर झाली आहेत, त्यातील एक आहे ते म्हणजे शेक्सपियर (William Shakespeare) . शेक्सपियर आजच वाचला जातो असं नाही, कित्येक शतकं होत आली तरी शेक्सपियर आजही तितक्याच तळमळीने आणि आस्थेने वाचला जातो. म्हणून त्याचे साहित्य, त्याचे नाटक (Drama) वाचून झालं की, एक प्रश्न कायम विचारला जातो की, शेक्सपियरला अमर बनवणारे अमृत येते कुठून? शेक्सपियरबद्दल पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर जग चार शतकं शोधत आहे. त्याला उत्तरंही मिळाली आहेत, पण ती उत्तरं फक्त परस्परविरोधी आणि अपूर्ण आहेत. ती यासाठीच अपूर्ण आहेत, कारण, शेक्सपियर नावाचा लेखक (Writer) खरच अमृताहूनी गोड असं काहीसं देणारा आहे. आज त्यांचा जन्मदिन, त्यानिमित्ताने…

शेक्सपियरच्या मृत्यूनंतरही गेल्या चार शतकांहून अधिक काळ तो आपल्या मरणाला अंगठा दाखवत आहे, म्हणून साहित्याचे अभ्यासक म्हणतात शेक्सपियर असं कोणतं अमृत पिऊन आलेला की तो अमर राहिला आहे.

टॉलस्टॉय आणि किंगलियर

इंग्रजी साहित्यात एक संदर्भ आढळतो की, त्यामध्ये असे नमूद केले आहे की, टॉलस्टॉय शेक्सपियरच्या ‘किंग लिअर’ या नाटकाचे रशियन भाषेत भाषांतर करत होता. किंग लिअर नाटकाच्या शेवटाकडे आल्यानंतर तो थरथर कापत होता, आणि त्यानंतर त्याने आपल्या अनुवादात राजाला वाचवले. किंबहुना त्याला किंग लिअरमध्ये त्याची प्रतिमा दिसू लागली.

मानवतावाद आणि विवेक

मानवी आयुष्य जगताना माणसाकडे जे गुण लागतात तेच गुण शेक्सपियरकेड होते, पण त्याच्याकडे एक खास गुण होता. ती म्हणजे नैसर्गिक मानवी स्वभाव आणि टोकाचा विवेक. म्हणून त्याच्या साहित्यातील पात्रे नेहमीच मानवतावादाची आणि विवेकाची अशी निर्विवाद पकड घेतात.

पात्रं दुःखद आणि मार्मिक

पात्रांची भाषा आणि पात्रांचे पोशाख हे अगदी वाचकाच्या मालकीचे होऊन जात. पण जर आपण किंग लिअर आणि टॉल्स्टॉय यांच्या जीवनावर नजर टाकली, तर दोघांचाही शेवट अत्यंत दु:खद आणि मार्मिक असाच आहे. म्हणजेच शेक्सपियरने किंग लिअरसाठी-आणि त्या अर्थाने की टॉल्स्टॉयसाठी जे नशीब ठरवले होते ते त्याच्या अधिकृत प्रयत्नानंतरही त्यातून सुटू शकले नाही, हेच शेक्सपयरच्या शब्दांचे गमक आहे.

श्रेष्ठ साहित्य असं मानलं जातं

शेक्सपियर वाचताना, त्याला समजून घेताना जीवन आणि साहित्य या दोघांचीही अनेक रहस्य आपल्याला नकळतपणे कळतात. साहित्य हे जीवनाचे प्रतिबिंब आहे असं म्हटले जाते, पण हे वाक्य सर्रासपणे बोलले जात असले तरी आपण आयुष्याविषयी जवळ जवळ अनभिज्ञ असतो. कारण जीवन गूढतेने भरलेले आहे– ते अनेक साधेपणा आणि गुंतागुंतीचे परिपूर्ण मिश्रण आहे. त्यात इतके पदर आहेत की साहित्याचा कोणताही आरसा तो अचूकपणे टिपू शकत नाही. जे साहित्य या जीवनाच्या अगदी जवळ जाऊन त्याच्या दिसणाऱ्या आणि न दिसणार्‍या पैलूंवर प्रकाश टाकते, अंधाऱ्या कोपऱ्यातून बाहेर काढते, तेच श्रेष्ठ साहित्य असं मानलं जातं.

विरोधाभासही शेक्सपियरच्या साहित्यात

शेक्सपियरच्या साहित्यात हेच आहे, त्याच्याकडे जादूचा फ्लॅशलाइट आहे, आणि त्या प्लॅशलाईटचीही एक गम्मतच आहे. त्याचा प्रकाश एकीकडे अतिशय अफाट दिसणार्‍या जीवनातील अगदी किरकोळ पैलूंवर पडतो आणि दुसरीकडे अतिशय विनम्र दिसणार्‍या अत्यंत विलक्षण पैलूंवरही प्रकाश असतो. येथे शुद्ध म्हणजे अगदी धुतलेल्या तांदळासारखे राज्य चालवण्याचा प्रयत्न करणारे मंत्री आहेत, आणि वासनांधमध्ये गुंतलेली पात्रंही आहेत. तर काही पात्रं ही जगावेगळी आहेत, एका साध्या माणसावर अन्याय होतो, हे पाहून वेश्यावस्तीत राहणाऱ्या दलालाचे रक्त खवळून उठते, हा विरोधाभासही शेक्सपियरच्या साहित्यातून दिसून येतो.

मानवी करुणेचा दृष्टीकोन

शेक्सपियरच्या नाटकात फक्त आदर्शवादी पात्रं आहेत असं नाहीत, तर वास्तवात जी आजूबाजूला पात्रं असतात, तशीच पात्रं शेक्सपियरच्या नाटकातून आणि साहित्यातून सापडतात. त्यांच्या साहित्या धाडसी खलनायक आहेत, जे सहजपणे आणि मुक्तपणे कबूल करतात की, ‘मी जे आहे तो नाही’ आणि जे नाही तो मी आहे, असं सांगणारी पात्रंसुद्धा आहेत. त्यासाठी ऑथेल्लोमधील ऑथेल्लोचा इगो पाहिल्यानंतर आणि वाचल्यानंतर वाचकांच्या लक्षात येते की, शेक्सपियर नावाचं फक्त चालतं बोलतं नाटक नव्हतं तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातील ती एक रंगमंचावरची रम्य पहाट होती. कायद्याच्या बंधनकारक न्यायापेक्षा मानवी करुणेचा दृष्टीकोन दिला आहे तो शेक्सपियर नावाच्या नाटकाकारानेच.

शेक्सपियरचे साहित्य सीमारेषा तोडणारे

आयुष्यात वादळे आल्यानंतर आपण हरवून जातो, शेक्सपियरच्या नाटकांमध्ये अनेक प्रकारच्या विलक्षण गोष्टी आहेत. आणि त्या उत्तर आधुनिकतेतील उत्तम भाष्य करणाऱ्या साहित्यामध्येही त्याच्या कथा, कविता आहेत. गुलजार त्यांच्या ‘कॉमेडी ऑफ एरर’ला ‘अंगूर’ सारख्या चित्रपटातून प्रेषकांसमोर घेऊन येतात. तर हबीब तन्वीर ‘मिडसमर नाईट्स ड्रीम’ चे रूपांतर ‘कामदेव का अपना वसंत ऋतू का सपना’ सारख्या नाटकावर वेगळ्या काल्पनिक देशी भाषेसाठी महत्वाचा ठरतो. यातील सर्वात वेगळे काम म्हणजे विशाल भारद्वाज यांचे काम, ज्यानी शेक्सपियरच्या तीन महान शोकांतिका, ‘मॅकबेथ’, ‘ऑथेलो’ आणि ‘हॅम्लेट’चे रूपांतर ‘मकबूल’, ‘ओंकारा’ आणि ‘हैदर’ या तीन वेगवेगळ्या चित्रपटांतून केले गेले. शेक्सपियरच्या नाटकावर कथा अवलंबून असल्या तरी त्या अभारतीय दिसत नाहीत, तर त्या भारतीयच जाणवतात, आणि वाटतात.

शेक्सपियर आपल्या मानसिक अवस्थेत

शेक्सपियरच्या साहित्याचा आपण जर विचार केला गेला तर आपल्याला कळतं की, शेक्सपियर नावाचा लेखक आपल्या आयुष्यावर किती परिणाम करुन गेला आहे ते. म्हणून काही अभ्यासक असं मानतात की, शेक्सपियर आपल्या मानसिक अवस्थेत मिसळून गेला आहे, आणि आपलाच तो एक भाग बनला आहे.

सगळ्याच गोष्टी आणि माणसांच्या अवस्था

शेक्सपियरच्या साहित्यातील जुळ्या भावांच्या विभक्त होण्याचा किस्सा असो, बाप-लेकींच्या परस्पर विश्वासाची कसोटी असो, किंवा प्रेमाची उदात्त खोली असो, मित्राची फसवणूक असो या सगळ्या गोष्टी आणि माणसांच्या अवस्था ज्या आजकाल समकालीन साहित्यात सापडतात, त्या सगळ्याच घटना वेगवेगळ्या संदर्भाने शेक्सपियरच्या साहित्यातही मिळतात.

एकरुप झालेलं साहित्य

जसे शेक्सपियरच्या साहित्यातील असणारे दुःख हे आपली व्यथा वाटते, तर कधी हेच आपले नशीब आहे असंही वाटतं इतकं त्याचं साहित्य एकरुप झालेलं आहे. शेक्सपियर जीवनातील सौंदर्य आणि कुरूपता, त्यातील सरळपणा आणि धूर्तपणा, त्यातील प्रेम आणि त्यात लपलेला द्वेष, आणि एकाच वेळी येणारी विडंबना, प्रेमाचा गंध आणि त्याचवेळी त्याच उत्कटतेतून येणारे विष या सगळ्याच गोष्टी त्यांनी आपल्या साहित्यातून आणल्या आहेत. शेक्सपियरचे असलेले दुःख हेच आपले आपल्याला प्रतिबिंब वाटते, आणि असंही वाटतं की, शेक्सपियर आतीही प्रत्येकाच्याच आयुष्यात डोकावत आहे.

शेक्सपियरची  सार्वत्रिक मान्यता

अर्थात शेक्सपियरच्या जागतिक अस्मितेला ब्रिटिश साम्राज्यवादाचीही मदत झाली आहे असं अभ्यासक आणि विचारवंत मानतात. पण शेक्सपियरचा हा जन्म ब्रिटीश साम्राज्यात झाला नव्हता. ज्या इंग्रजीमधून त्यांनी लिहिले आहे ते प्रमाणबद्ध स्वरूपही विकसित झालं नव्हतं त्याकाळी. शेक्सपियर हा कोणत्याही शास्त्रीय अर्थाने विद्वान किंवा अभ्यासक नव्हता. किंबहुना शेक्सपियरची लोककथाच त्याला अद्वितीय तेजाने तेजस्वी दिसत असते आणि त्याला सार्वत्रिक मान्यता मिळवून देते.

शेक्सपियरची पात्रे नियतीला मागे ढकलतात

शेक्सपियरने सांगितलेल्या कथा ऐकल्यासारखे वाटतात, पण तो अशा अनोख्या पद्धतीने सांगतो की कथा बदलते, पात्रे बदलतात आणि वातावरणही बदलते. शेक्सपियरने ग्रीक शोकांतिकेचे मूळ स्वरूप बदलले आहे हे इंग्रजी अभ्यासक आणि विचारवंतांना माहिती आहेच. ग्रीक शोकांतिकांमध्ये, मानवी नशिबाच्या हाताचा पुतळा दिसतो. पण शेक्सपियरची पात्रे नियतीला मागे ढकलतात आणि स्वतःचे नशीब तयार करतात.

संबंधित बातम्या

Nitesh Rane : “सोनिया गांधींपुढे झुकल्यामुळेच उद्धव ठाकरेंची मान दुखते, ते स्टेरॉईड घेऊन बोलतात”, नितेश राणेंचा पलटवार

Mask forced : कर्नाटकात पुन्हा एकदा मास्क सक्ती; महाराष्ट्रातही मास्क सक्ती होऊ शकते? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत

Ajit Pawar : ‘मातोश्री’बाहेरच हनुमान चालिसा म्हणण्याचा अट्टाहास का? अजित पवारांचा सवाल; भाजपवर घणाघात

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI