आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार इशान किशनने काय चुकलं ते सांगितलं, विराट कोहलीबाबत म्हणाला..

IPL 2026, SRH vs RCB: आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आरसीबीचा विजय, तर सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाला आहे. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ वरचढ दिसला. या पराभवाचं विश्लेषण इशान किशनने केलं आहे.

आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार इशान किशनने काय चुकलं ते सांगितलं, विराट कोहलीबाबत म्हणाला..
आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार इशान किशनने काय चुकलं ते सांगितलं, विराट कोहलीबाबत म्हणाला..
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 29, 2026 | 4:02 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत इशान किशनच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद हा संघ पहिल्यांदा मैदानात उतरला होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने हैदराबादच्या वाटेला प्रथम फलंदाजी आहे. हैदराबादने तीन विकेट झटपट गमावल्या. पण त्यानंतर इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी डाव सावरला. तर मधल्या फळीत अनिकेत वर्माने 18 चेंडूत 43 धावांची खेळी केली. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने 201 धावा करत आरसीबीसमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं. पण हे आव्हान आरसीबीने 15.4 षटकात फक्त 4 गडी गमवून पूर्ण केलं. 26 चेंडू राखून हा विजय मिळवल्याने नेट रनरेटही जबरदस्त झाला आहे. आरसीबीच्या खात्यात 2 गुण गेले असून नेट रनरेट हा +2.907 आहे. या पराभवानंतर इशान किशनच्या कर्णधारपदाचा खऱ्या अर्थाने कस लागला आहे. या पराभवानंतर इशान किशनने आपलं मत व्यक्त केलं आहे.

इशान किशन म्हणाला की, ‘मला वाटतं की पहिल्या 3-4 षटकांनंतर खेळपट्टी नक्कीच चांगली खेळली. आम्ही सुरुवातीलाच काही विकेट्स गमावल्या आणि पुढच्या वेळी आम्हाला याची काळजी घ्यावी लागेल. कारण, दुसऱ्या डावातील खेळपट्टी पाहता त्यावर फलंदाजी करणे खूप सोपे होते आणि चेंडू चांगलाच उसळत होता. पुढच्या वेळी आम्हाला शॉट निवडताना थोडे अधिक हुशारीने खेळावे लागेल. सुरूवातीला विकेट गमावल्यानंतर आम्ही चांगली कामगिरी केली. ज्यामुळे आमचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. विजयाचं श्रेय फलंदाजांना द्यावे लागेल, ज्या प्रकारे ते फलंदाजी करत होते, त्यातही विशेषतः विराट कोहली.. धावांचा पाठलाग करताना त्याची विकेट लवकरात लवकर घेणे खूप महत्त्वाचे आहे. नाहीतर, जर तो असाच खेळत राहिला, तर त्याला थांबवणे कठीण होईल. आम्हाला थोडी अधिक मेहनत करावी लागेल.’

इशान किशन म्हणाला की, ‘हा पहिला सामना आहे आणि सध्यासाठी या चुका स्वीकारार्ह आहेत. आम्ही गोलंदाजीमध्ये थोडे अधिक सावध राहू. या क्षेत्रांमध्ये आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. पुढच्या सामन्यापासून आम्ही अधिक मजबूत होऊ शकतो.’ कर्णधार म्हणून पहिल्या सामन्याबाबत इशान म्हणाला की, खरं तर मला खूप मजा आली, प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. ही आयपीएल आहे, त्यामुळे कधीकधी थोडी धाकधूक असते. पण एक संघ म्हणून आम्ही यातून अधिक चांगले होऊ. कर्णधारपदाबद्दल मी आणखी काय बोलू शकतो? जर आम्ही पुढचे सामने जिंकलो, तर स्पर्धेत पुढे जाणे आमच्यासाठी खूप सोपे होईल.

Follow Us