AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसणार? ऑपरेशन टायगरबाबत आतल्या गोटातून मोठी अपडेट, अनेक आमदार…

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत, अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार देखील एकनाथ शिंदेंच्या सर्पकात असल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात येत आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसणार? ऑपरेशन टायगरबाबत आतल्या गोटातून मोठी अपडेट, अनेक आमदार...
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 04, 2026 | 7:48 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. नुकतीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, सहा खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडे केवळ 3 खासदारच राहिले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या वाढून 13 वर पोहोचली आहे. दरम्यान महायुतीमध्ये खासदारांच्या संख्येच्या बाबतीत शिवसेना शिंदे गट हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मोठं विधान केलं आहे. आबिटकर यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले आबिटकर? 

ऑपरेशन टायगर दोन नंतर आता राजकीय वतृळात ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना आबिटकर यांनी मोठं विधान केलं आहे.  ऑपरेशन टायगर-3 कधी होईल तेही कळणार नाही,  एकनाथ शिंदे यांच्या झंझावतात अनेक आमदार, माजी मंत्री शिवसेनेत येणार आहेत.  केंद्रातील शिवसेनेचा चेहरा शिंदे साहेब राजकीय उपलब्धतेनुसार ठरवतील,  शिवसेना ठाकरे गट काय करतो यापेक्षा आमचा भर हा संघटना मजबूत करण्यावर आहे, असंही यावेळी आबिटकर यांनी म्हटलं आहे, ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

दरम्यान त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत देखील माहिती दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिंदे साहेबांना धावपळीमुळे त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र शिंदे साहेब हे ऐकणारे नाहीत. परंतु त्यांना सध्या आरामाची गरज आहे. अशी माहिती यावेळी  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी  दिली आहे. प्रकाश आबिटकर यांच्यापूर्वी मंत्री संजय शिरसाट यांनी देखील ऑपरेशन टायगर सुरू झालं असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे