
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी वयाच्या 43 व्या वर्षीही आयपीएलमध्ये खेळतोय. धोनीचं वय पाहता आयपीएलच्या 18 व्या मोसमानंतर दिग्गज खेळाडू निवृत्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. धोनी सध्या चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करत आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वात सीएसकेला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिलीय. मात्र ऋतुराज गायकवाड याला झालेल्या दुखापतीनंतर धोनीने कर्णधारपदाची सूत्र स्वीकारली. मात्र धोनीच्या नेतृत्वात सीएसकेची निराशाजनक कामगिरी राहिली. त्यामुळे सीएसकेचा प्लेऑफच्या शर्यतीतून पत्ता कट झाला आहे. धोनीला वैयक्तिक पातळीवरही काही खास करता आलेलं नाही. अशात आता धोनीचं संघात असण्यावरूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
धोनीला या हंगामात (IPL 2025) कर्णधार आणि फलंदाज म्हणून अपयश आलंय. मात्र त्यानंतरही धोनीचे चाहते त्याच्या मागे ठाम आहेत. सीएसकेला या मोसमात आणखी 2 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे धोनी या 2 सामन्यांनंतर यलो जर्सीमध्ये दिसणार की नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. मात्र धोनीच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
धोनी आयपीएल 2026 मध्ये खेळणार की नाही? याबाबत आतापासूनच चर्चा रंगली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रँचायजीमधील काही ठराविक सदस्यांनुसार, धोनी चेन्नईची साथ सोडण्यासाठी तयार नाही. टीममध्ये अजूनही काही गोष्टींमध्ये सुधारणा करायची आहे, ज्यासाठी धोनीचं मार्गदर्शन गरजेचं आहे. जर असं झालं तर निश्चितच धोनी आयपीएल 2026 मध्ये खेळताना दिसू शकतो.
थाला फॅन्ससाठी दिलासादायक बातमी
🚨 MS DHONI COMING FOR IPL 2026 🚨
– There is no retirement hint from MS Dhoni to Chennai Super Kings. [TOI] pic.twitter.com/csHoVKI1I2
— Johns. (@CricCrazyJohns) May 17, 2025
धोनीला निवृत्तीबाबत आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यादरम्यान विचारण्यात आलं होतं. “मी याबाबत काही वेळाने निर्णय घेईन”, असं उत्तर धोनीने आयपीएल 2025 नंतर निवृत्त होणार का? या प्रश्नावर दिलं होतं. तसेच धोनीने त्याच्या फिटनेसबाबतही भाष्य केलं होतं. “आयपीएलमध्ये खेळणार की नाही? हे फिटनेसवर अवलंबून असेल”, असंही महेंद्रसिंह धोनी याने स्पष्ट केलं होतं.