IPL 2022, SRH vs CSK : आज हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना, जाणून घ्या प्लेईंग इलेवन

| Updated on: May 01, 2022 | 3:46 PM

चेन्नईच्या वाईट काळात धोनीकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आल्यानं आजच्या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं विशेष लक्ष लागून आहे.

IPL 2022, SRH vs CSK : आज हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना, जाणून घ्या प्लेईंग इलेवन
आज सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज सनराईजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) सामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. त्यापूर्वी 7 वाजता दोन्ही संघामध्ये टॉस होईल. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास सनराईजर्स हैदराबाद हा संघ पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. हैदराबाद संघाने एकूण 8 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना 5 सामन्यात जिंकता आलंय. तर 3 सामन्यात हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागलाय. या संघाला पॉईंट्स टेबलमध्ये एकूण 10 पॉईंट्स मिळाले आहेत. तर नेट रेट 0.600 आहे.दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्स पॉई्ट्स टेबलमध्ये नवव्या क्रामांकावर आहे. त्यामुळे या संघाकडून आणखी चांगल्या कामगिरी अपेक्षा आहे. चेन्नईने एकुण 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी 2 सामन्यात यश आलंय. तर 6  सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागलाय. या संघाला आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये 4 पॉईंट्स मिळाले आहेत. तर नेट रेट -0.538 आहे.

सीएसकेचं नेतृत्व पुन्हा एमएस धोनीकडे

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा मध्यावर आलेली असताना चेन्नई सुपर किंग्समध्ये एका मोठी घडामोड घडली. खरंतर असं काही तरी घडेल, अशी कोणीच अपेक्षा केली नव्हती. कारण चेन्नईच्या टीम मॅनेजमेंटने कधी धरसोड वृत्तीने निर्णय घेतलेले नाहीत. काल रवींद्र जाडेजाने चेन्नई सुपर किंग्सच्या कॅप्टनशिपचा राजीनामा दिला. पुन्हा एकदा या टीमचे नेतृत्व एमएस धोनीकडे सोपवण्यात आलं आहे. आयपीएल 2022 स्पर्धा सुरु होण्याच्या दोन दिवस आधी जाडेजाला कर्णधारपदावर नियुक्त करण्यात आलं होतं. हा निर्णय स्वत: धोनीने घेतला होता. धोनीने जवळपास दशकभरापेक्षा जास्त काळ CSK चं कर्णधारपद भुषवल्यानंतर रवींद्र जाडेजाकडे कॅप्टनशिप सोपवली होती. पण रवींद्र जाडेजाला आपली छाप उमटवता आली नाही.

दोन्ही संघाचे प्लेइंग इलेवन

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ड्वेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, महेश थिकशन, मुकेश चौधरी.

हे सुद्धा वाचा

सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, मार्को जॅन्सन, उमरान मलिक.

धोनीच्या नेतृत्वात सीएसके खेळणार

काल रवींद्र जाडेजाने चेन्नई सुपर किंग्सच्या कॅप्टनशिपचा राजीनामा दिला. पुन्हा एकदा या टीमचे नेतृत्व एमएस धोनीकडे सोपवण्यात आलं आहे. आयपीएल 2022 स्पर्धा सुरु होण्याच्या दोन दिवस आधी जाडेजाला कर्णधारपदावर नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र, आता चेन्नईच्या वाईट काळात धोनीकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आल्यानं आजच्या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं विशेष लक्ष लागून आहे.