Mumbai Murder : गोरेगावमध्ये किरकोळ वादातून प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, मृतदेह गोणीत भरुन नदीत फेकला

वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी संध्याकाळी पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह गोणीत भरुन फेकलेला आढळला. यानंतर पोलिसांनी वेगात तपास करत मृत तरुणीची ओळख पटवली. पोलिस तपासात मुलगी 25 एप्रिलपासून बेपत्ता असल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या घरच्यांशी संपर्क साधला. चौकशीत पोलिसांना मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली.

Mumbai Murder : गोरेगावमध्ये किरकोळ वादातून प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, मृतदेह गोणीत भरुन नदीत फेकला
बीडमध्ये बस स्थानकात संशयास्पद बॅग आढळल्याने खळबळ
Image Credit source: tv9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

May 01, 2022 | 3:34 PM

मुंबई : किरकोळ कारणातून एका 18 वर्षीय तरुणीची प्रियकरा (Boyfriend)ने गळा दाबून हत्या (Murder) केल्याची घटना गोरेगावमध्ये उघडकीस आली आहे. सोनम शुक्ला असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून मोहम्मद अन्सारी असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सोनमचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत स्थानिकांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी गोरेगावमधील प्रेमनगरमध्ये बेकरी चालवतो तर पीडित तरुणी नीट परीक्षेची तयारी करत होती. याप्रकरणी पोलिस पुढील कार्यवाही करत आहेत. (Murder of a girlfriend by a boyfriend in a minor dispute in Goregaon)

25 एप्रिलपासून मुलगी बेपत्ता होती

पीडित मुलगी 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता नेहमीप्रमाणे क्लाससाठी घरुन गेली होती. मात्र क्लासमध्ये पोहचलीच नाही. तपास केला असता कळले की मुलगी घरुन निघाल्यानंतर क्लासमध्ये न जाता मैत्रिणीच्या घरी गेली. रात्री 9.30 वाजेपर्यंत मुलगी घरी न परतल्याने वडिलांनी फोन केला असता मुलीने आपण मैत्रिणीच्या घरी असून थोड्या वेळात घरी येतो असे सांगितले. मात्र रात्री 11.30 वाजले तरी ती घरी आलीच नाही. तिला फोन केला असता तिचा फोनही बंद येत होता. त्यानंतर आई-वडिलांनी तिचा शोध सुरु केला. मात्र तिचा कुठेही शोध लागला नाही त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

पोलिस तपासात प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचे निष्पन्न

वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी संध्याकाळी पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह गोणीत भरुन फेकलेला आढळला. यानंतर पोलिसांनी वेगात तपास करत मृत तरुणीची ओळख पटवली. पोलिस तपासात मुलगी 25 एप्रिलपासून बेपत्ता असल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या घरच्यांशी संपर्क साधला. चौकशीत पोलिसांना मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिच्या प्रियकराला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला होता. यातूनच आरोपीने तरुणीचा गळा दाबून तिची हत्या केली आणि मृतदेह एका गोणीत बांधून नदीत फेकून दिला. (Murder of a girlfriend by a boyfriend in a minor dispute in Goregaon)

हे सुद्धा वाचा

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें