CSK vs KKR Live Streaming : चेन्नई-केकेआरमध्ये 2 गुणांसाठी टफ फाईट, सामना किती वाजता?

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders IPL 2026 Live Scorecard : अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

CSK vs KKR Live Streaming : चेन्नई-केकेआरमध्ये 2 गुणांसाठी टफ फाईट, सामना किती वाजता?
CSK vs KKR Live Streaming
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 14, 2026 | 1:55 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 22 व्या सामन्यात 2 चॅम्पियन्स संघ आमनेसामने असणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना होणार आहे. दोन्ही संघांना या मोसमात लौकीकाला शोभणारी कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईला 4 पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सला खेळलेल्या चारही सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसर्‍या बाजूला चेन्नईचा विजयी ट्रॅकवर कायम राहण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना उभयसंघात 2 गुणांसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने चेन्नई विरुद्ध केकेआर सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कधी?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना मंगळवारी 14 एप्रलिला होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कुठे?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

दोन्ही संघांची दुरावस्था

दरम्यान चेन्नई आणि कोलकाता दोन्ही संघांनी आतापर्यंत या मोसमात आपल्या चाहत्यांनी घोर निराशा केली आहे. मंगळवारी दोन्ही संघांचा हा या मोसमातील पाचवा सामना असणार आहे. त्यामुळे केकेआर चेन्नईला पराभूत करुन विजयाचं खातं उघडण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. तर चेन्नई या मोसमात घरच्या मैदानात आणि एकूण दुसरा विजय मिळवण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us