AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chetan sharma Resign : तोंड लपवण्याची वेळ, वेशांतर करुन फिराव लागलं, चेतन शर्मांचा दुर्देवी शेवट

Chetan sharma Resign : या स्टिंगमध्ये चेतन शर्मा नको तेवढं बोलून गेले, त्यामुळे त्यांची खुर्ची जाणार हे निश्चित होतं. चेतन शर्मा यांना मागच्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा चीफ सिलेक्टरच पद सोडावं लागलय.

Chetan sharma Resign : तोंड लपवण्याची वेळ, वेशांतर करुन फिराव लागलं, चेतन शर्मांचा दुर्देवी शेवट
chetan sharmaImage Credit source: bcci
| Updated on: Feb 17, 2023 | 12:10 PM
Share

Chetan sharma Resign : चेतन शर्मा यांना अखेर चीफ सिलेक्टरच पद सोडाव लागलय. माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बीसीसीआयने त्यांचा राजीनामा मंजूर केलाय. चेतन शर्मा एका स्टिंग ऑपरेशनमध्ये फसले होते. या स्टिंगमध्ये चेतन शर्मा नको तेवढं बोलून गेले, त्यामुळे त्यांची खुर्ची जाणार हे निश्चित होतं. चेतन शर्मा यांना मागच्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा चीफ सिलेक्टरच पद सोडावं लागलय. T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाच्या खराब प्रदर्शनानंतर चेतन शर्मा यांना पदावरुन हटवण्यात आलं होतं. पण पुढच्याच महिन्यात पुन्हा त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. बीसीसीआयच्या या निर्णयावर बरीच टीका झाली होती. आता पुन्हा एकदा चेतन शर्मा यांची उचलबांगडी करण्यात आलीय.

चेतन शर्मा यांच्या चीफ सिलेक्टर पदाचा शेवट बिलकुल त्यांच्या क्रिकेट करिअरसारखा झाला. चेतन शर्मा एक चांगले वेगवान गोलंदाज होते. पण करिअर दरम्यान त्यांना तोंड लपवून आणि वेश बदलून फिरण्याची वेळ आली होती.

देशात वेशांतर करुन फिरण्याची वेळ

आता एका स्टिंगमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागलाय. ते क्रिकेट खेळायचे त्यावेळी अशीच एक घटना घडली, जी आजही क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे. त्यामुळेच चेतन शर्मा ओळखले जायचे. फक्त एका चेंडूमुळे त्यांच्यावर देशात तोंड लपवून, वेशांतर करुन फिरण्याची वेळ आली होती. 1986 साली आशिया कपच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या टीम आमने-सामने होत्या. पाकिस्तानला शेवटच्या बॉलवर 6 रन्सची गरज होती. चेतन शर्मा ती ओव्हर टाकत होता. जावेद मियाँदादने शर्मा यांच्या लास्ट बॉलवर सिक्स मारला. त्यानंतर चेतन शर्मा फॅन्सच्या नजरेत विलन बनले. त्यांना वेशांतर करुन देशात फिरावं लागलं. 1994 मध्ये चेतन शर्माच करिअर संपलं

चेतन शर्मा यांच्या क्रिकेट करिअरचा शेवटही खूप वाईट होता. 1994 साली देशासाठी चेतन शर्मा शेवटचा सामना खेळले होते. न्यूझीलंड विरुद्ध एका ओव्हरमध्ये त्याने 23 धावा दिल्या होत्या. स्टीफन फ्लेमिंगने एका ओव्हरमध्ये सलग पाच चौकार मारले. चेतन शर्माला मॅचमध्ये फक्त एक ओव्हर मिळाली. आता चीफ सिलेक्टर म्हणूनही त्यांच्या करिअरचा तसाच शेवट झालय.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ