AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sarfaraz Khan चा छोटा भाऊ सुद्धा कमाल, मुंबईच्या टीममधून OUT होताच, बोलला नाय, डायरेक्ट करुन दाखवलं VIDEO

Sarfaraz Khan - सध्या सर्फराज रणजी ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. त्याचवेळी त्याच्या छोट्या भावाची बॅट सुद्धा चांगलीच गरजतेय. मुशीर खान सुद्धा जबरदस्त बॅटिंग करतोय.

Sarfaraz Khan चा छोटा भाऊ सुद्धा कमाल, मुंबईच्या टीममधून OUT होताच, बोलला नाय, डायरेक्ट करुन दाखवलं VIDEO
sarfaraz khan with brother
| Updated on: Jan 23, 2023 | 1:34 PM
Share

मुंबई – ‘बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां सुभान अल्लाह’ अमिताभ बच्चन आणि गोविंदावर चित्रित करण्यात आलेलं हे गाण सर्फराज खान आणि त्याच्या भावावर एकदम फिट बसतं. सध्या सर्फराज रणजी ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. त्याचवेळी त्याच्या छोट्या भावाची बॅट सुद्धा चांगलीच गरजतेय. मुशीर खान सुद्धा जबरदस्त बॅटिंग करतोय. मुशीरने थेट ट्रिपल सेंच्युरी ठोकली आहे. मुशीरला काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रणजी टीममधून बाहेर करण्यात आलं. आता त्याने सीके नायडू ट्रॉफीमध्ये मुंबईच्या टीमकडूनच खेळताना हैदराबाद विरुद्ध तिहेरी शतक ठोकलय.

सर्फराजचा भाऊ मुंबईकडून किती रणजी सामने खेळलाय?

लंच ब्रेकपर्यंत मुशीरने 358 चेंडूत 320 धावा केल्या आहेत. या दरम्यान मुशीरने 33 फोर आणि 7 सिक्स मारले. मुशीरने डिसेंबर महिन्यात सौराष्ट्राविरुद्ध फर्स्ट क्लासमध्ये डेब्यु केला होता. या सीजनमध्ये मुंबईकडून तो रणजी ट्रॉफीमध्ये तीन सामने खेळला. पण त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

रणजी ट्रॉफीमध्ये फ्लॉप

मुंबईच्या टीममधून रणजीमध्ये संधी मिळाली. पण मुशीरने 3 सामन्यात 5 इनिंगमध्ये फक्त एकदाच 25 पेक्षा जास्त धावा केल्या. त्याने आसाम विरुद्ध 42 धावा केल्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमधील त्याच्या या सर्वाधिक धावा आहेत. या सामन्यात त्याने 11 रन्सवर 2 विकेटही काढल्या. मुशीर दिल्ली विरुद्ध रणजी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला टीम बाहेर करण्यात आलं. आता त्याने आपला क्लास दाखवलाय. अथर्वची भक्कम साथ

मुशीरच्या दमदार बॅटिंगच्या बळावर मुंबईने लंच ब्रेकपर्यंत 5 विकेट गमावून 625 धावा केल्या आहेत. अथर्व अंकोलेकर त्याला क्रीजवर साथ देतोय. त्याने डबल सेंच्युरी ठोकलीय. 400 धावा पूर्ण करण्याचा मुशीरचा प्रयत्न असेल. अर्थवची नजर त्रिशतकावर आहे. मुशीरचा भाऊ सर्फराजबद्दल बोलायच झाल्यास, त्याने मागच्या 10 सामन्यात 4 सेंच्युरी झळकवल्यात. तो सध्या फुल फॉर्ममध्ये आहे. मात्र तरीही ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजसाठी त्याची टीममध्ये निवड झालेली नाही.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.