VIDEO : क्रिकेटच्या मैदानात दोन संघांमध्ये तुफान हाणामारी , पंचांनी दिला असा निर्णय की थेट हमरीतुमरी
क्रिकेटमध्ये शक्यतो संपूर्ण संघ भिडण्याची वेळ कधी येत नाही. पण बांगलादेशमध्ये एका क्रिकेट सामन्यात हाणामारी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर क्रिकेटचं मैदान आहे की डब्ल्यूडब्ल्यूईचा आखाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात एखादा राडा होणं तसं दुर्मिळ आहे. एखाद दोन खेळाडू कधी भिडले तर भिडले. अन्यथा कधीच तसं चित्र पाहायला मिळत नाही. त्यामुळे हाणामारी झाली तर ती दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये होते. पण बांगलादेशमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. या स्पर्धेत मुस्तफा कमाल रियाज आणि दीपांकर दीपन या दोन संघात सामना सुरु होता. या दरम्यान दोन्ही संघांमध्ये एका निर्णयामुळे वाद झाला आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. हे दृष्य पाहून नेमकं हे क्रिकेटचं मैदाना आहे की, डब्ल्यूडब्ल्यूई आखाडा असा प्रश्न उपस्थित प्रेक्षकांना पडला होता. हे प्रकरण इतकं वाढलं की स्पर्धाच रद्द करावी लागली. या हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत. इतकंच काय तर मुलं आणि मुली दोघंडी भिडले.
या कारणामुळे झाला वाद
रिपोर्टनुसार, सामन्यात हाणामारी पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे झाली. या सामन्यात मुलं आणि मुली पंचांनी चौकार न दिल्याने समोरासमोर उभे ठाकले. त्याचबरोबर फलंदाजाला बाद दिल्याने हा वाद आणखी चिघळला. वाद इतका टोकाला गेला की हातात बॅट घेऊन मारण्याचा प्रयत्न झाला. शेवटी इतकं मोठा वाद पाहता ही स्पर्धाच रद्द करण्यात आली आहे.
Celebrity Cricket League has turned into WWE Royal Rumble. 😂
– 6 people got injured– Tournament got cancelled before semis
30+ year old male & female adults fighting over boundary & out decision in a ‘friendly’ tournament. 🤣 pic.twitter.com/FOAxEI00rz
— Saif Ahmed 🇧🇩 (@saifahmed75) September 30, 2023
Hilarious scenes in Celebrity Cricket League. 😂
A celebrity crying because an umpire didn’t give a boundary which was clearly a four.
Two teams fought badly, 6 people injured in hospital and the tournament is now cancelled!!! pic.twitter.com/brEYCKzIw3
— Saif Ahmed 🇧🇩 (@saifahmed75) September 30, 2023
यापूर्वी क्रिकेट मैदानात असं कधीच झालं नाही
क्रिकेट मैदानात यापूर्वी असं कधीच झालं नाही. जास्तीत दोन ते तीन खेळाडू भिडल्याचं चित्र पाहिलं गेलं आहे. इतका वाद टोकाला जाणं गल्ली क्रिकेटमध्ये फार फार तर झाला असेल. दुसरीकडे हे काही प्रोफेशनल क्रिकेटर नव्हते. पण बांगलादेशमधील सेलिब्रिटी आहेत. या हाणामारीनंतर सामन्यातील मुलींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात मुलगी फलंदाजाने चौकार मारला पण दिला नसल्याचा आरोप करत आहे.
