AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Commonwealth Games : भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार, कुणाला संधी? जाणून घ्या..

Commonwealth Games : भारतीय महिला क्रिकेट संघ 215 सदस्य आहे. हे सर्व सदस्य बर्मिंगहॅमला जाणार आहेत. या संघात 108 पुरुष आणि 107 महिलांचा समावेश आहे. एकूण सदस्य 322 असतील. यामध्ये 72 संघ अधिकारी, 26 अतिरिक्त अधिकारी, नऊ प्रासंगिक कर्मचारी आणि तीन महाव्यवस्थापकांचा समावेश आहे.

Commonwealth Games : भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार, कुणाला संधी? जाणून घ्या..
हरमनप्रीत कौर (कर्णधार)Image Credit source: social
| Updated on: Jul 12, 2022 | 6:44 AM
Share

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी (Commonwealth Games) भारतीय महिला क्रिकेट संघाची सोमवारी (11 जुलै) घोषणा करण्यात आली. हरनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. अष्टपैलू जेमिमा रॉड्रिग्जचं टी-20 संघात पुनरागमन झालं आहे. या स्पर्धेत 24 वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन झालं आहे. शेवटच्या वेळी 1998 मध्ये क्रिकेटचा भाग होती. यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत फक्त महिला संघच सहभागी होणार आहेत. कसोटी क्रिकेटसाठी प्रसिद्ध असलेल्या एजबॅस्टनमध्ये क्रिकेटचे सामने होणार आहेत. स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत. यामुळे या संघात  कोण असणार याविषयी उत्सुकता आहे. राष्ट्रकुल स्पर्धेची जगभरातील लोकांना उत्सुकता असते. या स्पर्धेकडे लोक लक्ष देऊन असतात. विशेष म्हणजे आता महिला क्रिकेट संघाच्या चाहत्यांना देखील राष्ट्रकुल संघात भारीतय महिला क्रिकेट संघाची (Indian Women Cricket Team) कामगिरी पाहता येणार आहे.

बीसीसीआयचं ट्विट

भारतीय महिला क्रिकेट संघात कुणाला संधी?

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस मेघना, तानिया भाटिया (wk), यास्तिका भाटिया (डब्ल्यूके), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा.

स्टँडबाय खेळाडू : सिमरन दिल बहादूर, रिचा घोष, पूनम यादव.

भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध

भारत अ गटात ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस आणि पाकिस्तानसोबत आहे. ब गटात श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांना स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया 29 जुलैला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.

भारतातील 215 खेळाडू बर्मिंगहॅमला जाणार

भारतीय महिला क्रिकेट संघ 215 सदस्य आहे. हे सर्व सदस्य बर्मिंगहॅमला जाणार आहेत. या संघात 108 पुरुष आणि 107 महिलांचा समावेश आहे. एकूण सदस्य 322 असतील. यामध्ये 72 संघ अधिकारी, 26 अतिरिक्त अधिकारी, नऊ प्रासंगिक कर्मचारी आणि तीन महाव्यवस्थापकांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेने सुवर्णपदक जिंकले

यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत 19 खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. क्रिकेट शेवटचे क्वालालंपूर गेम्समध्ये पाहिले होते. त्यानंतर 50 षटकांचे सामने खेळवले गेले. फक्त पुरुष संघांनी भाग घेतला. यावेळी 16 संघांनी सहभाग घेतला. अॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, स्टीव्ह वॉ, शॉन पोलॉक, जॅक कॅलिस या दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.