AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CPL : जगातील सर्वात अनफिट खेळाडूने घेतला खतरनाक कॅच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Azam Khan Super Catch : वजन काय पाहता कॅच पाहा, भलेभले या पठ्ठ्याच्या कॅच पाहून गार पडलेत. वजन 100 किलोपेक्षा जास्त पण कॅच एकदम लवचिक खेळाडूप्रमाणे घेतलाय.

CPL : जगातील सर्वात अनफिट खेळाडूने घेतला खतरनाक कॅच, व्हिडीओ होतोय व्हायरल
| Updated on: Sep 06, 2023 | 5:19 PM
Share

मुंबई : क्रिकेटमध्ये तुम्ही आतापर्यंत अनेक अतरंगी कॅच पाहिले असतील. दिवसेंदिवस फिल्डिंगचा दर्जा सुधारताना दिसत आहे. सर्वच संघातील खेळाडू फिल्डिंगवर काम करतात. कारण एक कॅचसुद्धा संपूर्ण सामना पालटवू शकतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सर्वात अनफिट कीपरपैकी असलेल्या खेळाडूने जबरदस्त कॅच घेतला आहे.

पाहा व्हिडीओ-: 

कोण आहे तो खेळाडू?

पाकिस्तानचा माजी विकेटकीपर मोईन खान सर्वांनाच माहित आहे. पाकिस्तानच्या मोठ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो. त्याचा मुलगा आझम खान हासुद्धा क्रिकेटपटू आहे. आझम खान हा अनफिट असल्याने त्याला पाकिस्तान संघाकडून काही जास्त संधी मिळाली नाही. पण याच आझम खानने डाय मारत एक कडक कॅच घेतला आहे.

आझम खान याचं वजन 140 किलोपेक्षा जास्त होतं. त्याने आता आपलं वजन कमी करण्यास सुरूवात केली आहे. तरीही त्याचंं वजन आताही 100 किलोपेक्षा जास्त आहे. आझम हा आत्ता 25 वर्षांचा असून तो सर्वच लीगमध्ये खेळताना दिसतो. आता कॅरेबियन लीग सुरू असून त्यामध्य तो गयाना अॅमेझॉन वॉरियर्सकडून खेळत आहे. त्रिनबागो नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने कमाल झेल घेतला. 5 व्या ओव्हरमध्ये निकोलस पूरन याचा कॅच आझमच्या दिशेने गेला. मात्र हा झेल काही सोपा नव्हता.

दरम्यान, आझम खान याने घेतलेला कॅच पाहून त्याचं समालोचकांनीही कौतुक केलं होतं. अ‍ॅमेझॉन वॉरियर्सकडून खेळताना त्याने 14 बॉलमध्ये 29 धावांची खेळी केली. यामध्ये दोन चौकार आणि तीन षटकार मारले. आंद्रे रसेल याच्या बॉलिंगवर षटकार मारत त्याने संघाला विजय मिळवून दिला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.