US Open स्पर्धेत राडा! पंचासोबत वाद आणि तळपायाची आग मस्तकात जाताच रॅकेट तोडून टाकलं Watch Video

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा सुरु असून या स्पर्धेत एक धक्कादायक प्रकार घडला. या स्पर्धेत गतविजेत्या डॅनिल मेदवेदेवला पराभवाला सामोरं जावं लागलं. 51वी रँकिंग असलेल्या खेळाडूने पराभूत केलं. या स्पर्धेत बराच राडा पाहायला मिळाला.

US Open स्पर्धेत राडा! पंचासोबत वाद आणि तळपायाची आग मस्तकात जाताच रॅकेट तोडून टाकलं Watch Video
US Open स्पर्धेत राडा! पंचासोबत वाद आणि तळपायाची आग मस्तकात जाताच रॅकेट तोडून टाकलं
| Updated on: Aug 25, 2025 | 10:05 PM

अमेरिकन टेनिस 2025 स्पर्धेचा थरार सुरु झाला आहे. ही स्पर्धा न्यूयॉर्कमध्ये 24 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या वर्षातील ही शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. त्यामुळे विजयी शेवट करण्यासाठी टेनिस स्टार आतुर आहेत. या स्पर्धेची सुरुवात जबरदस्त झाली. नोवाक जोकोविच, एम्मा रादुकानु आणि बेन शेल्टन या टेनिसपटूंनी पहिल्या फेरीत विजयी सलामी देत कूच केली आहे. पण या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक प्रकारही घडला. दरवर्षीप्रमणे यंदाही पहिल्याच दिवशी मोठी अपसेड पाहायला मिळाला. अमेरिकन स्पर्धेचा गतविजेता डॅनिल मेदवेदेवला याला पहिल्या फेरीतच धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे टेनिस जगतात खळबळ उडाली आहे. 13 व्या मानांकित मेदवेदवला 51व्या क्रमांकाच्या फ्रेंच टेनिसपटून बेंझामिन बोन्झीने याने पराभवाचा धक्का दिला. हा सामना पाचव्या सेटपर्यंत चालाल. पण मेदवेदवला विजय काही मिळवता आला नाही.

बेंझामिन बोन्झीने हा सामना 6-3, 7-5, 5-7, 0-6, 6-4 ने जिंकला. या विजयासह बोन्झीने पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. तर डॅनिलचं आव्हान पहिल्या सामन्यात संपुष्टात आलं आहे. हा पराभव डॅनिलच्या खूपच जिव्हारी लागला. त्याला हा पराभव सहन झाला नाही. त्याला या पराभवामुळे धक्का बसला. सामना संपल्यानंतर बेंचवर बसला आणि त्याने सर्व राग हा टेनिस रॅकेटवर काढला आणि मोडून टाकलं. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मेदवेदेवने असं करण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्याने असं केलं आहे.

मेदवेदेव असं करण्यापूर्वी पंचांशी देखील वाद घातला होता. पहिले दोन सेट गमावल्यानंतर मेदवेदेव अस्वस्थ झाला होता. तिसऱ्या सेटमध्ये बोन्झी 5-4 ने आघाडीवर होता आणि सेट जिंकण्यासाठी फक्त एक गुण पाहीजे होता. त्याची सर्व्हिस चुकली आणि दुसऱ्या सर्व्हिसची तयारी सुरु केली. तेव्हा फोटोग्राफर जवळ आल्याने भोन्झी चाचपडला. त्यामुळे पंचांनी त्याला पुन्हा सर्व्हिस करण्याची परवानगी दिली. त्यामुळे मेदवेदेव संतापला. यावेळी त्याने अश्लील हावभाव करत पंचांवर राग व्यक्त केला होता. यामुळे सामना पाच ते सहा मिनिटं थांबवावा लागला.

मेदवेदेवने तिसरा सेट जिंकला. तसेच चौथ्या सेटमध्ये बरोबरी साधली. पण पाचव्या सेट गमावला आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पण मेदवेदवने या सामन्यात घातलेल्या गोंधळामुळे शिक्षा होऊ शकते तसेच दंड भरावा लागू शकतो.