IND vs AFG: वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन करणार ओपनिंग? अफगाणिस्तानविरुद्ध अशी असेल रणनिती!

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतून संजू सॅमसनने पुन्हा एकदा टी20 संघात पदार्पण केलं आहे. पण सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार का? असाही प्रश्न आहे.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन करणार ओपनिंग? अफगाणिस्तानविरुद्ध अशी असेल रणनिती!
IND vs AFG: वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन करणार ओपनिंग? अफगाणिस्तानविरुद्ध अशी असेल रणनिती!
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 04, 2026 | 9:49 PM

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेबाबत क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कारण पुन्हा एकदा चौकार आणि षटकाराची आतषबाजी पाहायला मिळणार आहे. ही मालिका नवी दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात होणार असल्याने भारतीय खेळाडूंना होमग्राउंडचा लाभ मिळेल ते वेगळं… असं असताना या सामन्यात प्लेइंग 11 कशी असेल याबाबत आतापासूनच उत्सुकता आहे. यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनसाठी मागचे काही सामने चांगले गेलेले नाहीत. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणंही कठीण मानलं जात आहे. पण संघात पुनरागमन केल्याने संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. इतकंच काय तर संघात दिग्गज आणि आक्रमक फलंदाज असल्याने ओपनिंग कोण करणार? असाही प्रश्न आहे. वैभव सूर्यवंशी ओपनिंगला उतरणार हे कन्फर्म आहे. पण त्याच्यासोबत कोण उतरेल असा प्रश्न विचारला आहे. माजी विकेटकीपर फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक दीप दासगुप्ता यांनी संजू सॅमसनला पसंती दिली आहे.

काय म्हणाले दीप दासगुप्ता?

दीप दासगुप्ता यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये प्लेइंग 11 बाबत भाष्य केलं आहे. त्यात ओपनिंगसाठी त्यांनी सूचवलेली जोडी आश्चर्यकारक आहे. दीप दासगुप्ता यांच्या मते, या मालिकेसाठी वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन यांच्या जोडीला संधी दिली पाहिजे. टीम इंडियाकडे सलामीचे तीन चांगले पर्याय आहेत. पण सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या जोडीला यापूर्वीच संधी देण्यात आली आहे. तर वैभव आणि अभिषेक यांनीही सलामीला फलंदाजी केली आहे. त्यामुळे यावेळी वैभव आणि सॅमसन ही जोडी एक जोडी म्हणून कशी खेळते हे पाहण्यासाठी त्यांना संधी देण्याची वेळ आहे.

वैभव सूर्यवंशी-संजू सॅमसन जोडी प्रभावी ठरणार का?

खरं तर या जोडीचा विचार करण्यास काही हरकत नाही. कारण ओपनिंग लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन होऊ शकतं. त्यामुळे गोलंदाजांना अडचणीचं ठरू शकतो. कारण हे दोन्ही फलंदाज आक्रमक खेळण्यास पटाईत आहे. त्यामुळे स्ट्राईकला कोणीही आलं तरी गोलंदाजांची डोकेदुखी वाढू शकते. ही जोडी मैदानात उतरली तर अभिषेक शर्मा कोणत्या स्थानावर फलंदाजी उतरणार हा प्रश्न आहे. अभिषेक शर्माला आराम दिला जाणार का? कि तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरणार हा प्रश्न आहे. त्यामुळे कमालीची उत्सुकता लागून आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us