AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 Points Table | पाकिस्तानने मोठ्या विजयासह गुणतालिकेत घेतली झेप, टीम इंडियाची धाकधूक वाढली

World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. जय पराजयासह गुणतालिकेत मोठा फरक दिसून येत आहे. एक पराभव किंवा मोठ्या फरकाने झालेला विजय संपूर्ण गणित बिघडवू शकतो. असंच पाकिस्तानच्या विजयानंतर गुणतालिकेत पाहायला मिळाल.

World Cup 2023 Points Table | पाकिस्तानने मोठ्या विजयासह गुणतालिकेत घेतली झेप, टीम इंडियाची धाकधूक वाढली
World Cup 2023 Points Table | श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत केल्याचा पाकिस्तानला फायदा, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
| Updated on: Oct 10, 2023 | 11:15 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दहा संघ सहभागी असून रॉबिन राउंड पद्धतीने सामने होत आहेत. त्यामुळे प्रत्येक संघ साखळी फेरीत एकमेकांसमोर एकदाच उभा ठाकणार आहे. प्रत्येक संघ 9 सामने खेळणार असून टॉप 4 संघांची वर्णी उपांत्य फेरीत लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक विजयासोबत नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात स्पर्धेतील नववा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने पाकिस्तानला नेट रनरेटमध्ये मोठा फायदा झाला आहे.

श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे श्रीलंकन फलंदाजांनी कामगिरी केली. कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा यांच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 344 धावांचा डोंगर रचला. श्रीलंकेने 9 गडी गमवून 344 धावा केल्या आणि विजयासाठी 345 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पाकिस्तानला पेलवणार नाही असंच सुरुवातीला वाटत होतं. पण पाकिस्तानने करून दाखवलं.

मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफिक यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 345 धावांचं आव्हान 4 गडी गमवून पूर्ण केलं. यामुळे पाकिस्तानला 2 गुण तर मिळाले वरून नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. गुणतालिकेत पाकिस्तानने थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच नेट रनरेट पाहता टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

संघ सामने विजय पराभव गुणनेट रनरेट
भारत77014+2.102
दक्षिण अफ्रिका76112+2.290
ऑस्ट्रेलिया75210+0.924
न्यूझीलंड8448+0.398
पाकिस्तान8448+0.036
अफगाणिस्तान7438-0.330
श्रीलंका 7254-1.162
नेदरलँड्स7254-1.398
बांगलादेश7162-1.446
इंग्लंड7162-1.504

न्यूझीलंडचा संघ 4 गुण आणि +1.958 नेट रनरेटसह पहिल्या, पाकिस्तान 4 गुण आणि +0.927 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी, दक्षिण आफ्रिका 2 गुण आणि +2.040 नेट रनरेटसह तिसऱ्या आणि भारत 2 गुण आणइ +0.883 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी टीम इंडियाला विजयासोबत नेट रनरेटही चांगला ठेवणं गरजेचं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला सामना होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शनाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना आणि दिलशान मधुशंका.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच