AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant च्या जागी दिल्ली कॅपिटल्सने निवडला नवीन कॅप्टन, अक्षर पटेल उपकर्णधार

IPL 2023 ची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. नव्या सीजनच्या सुरुवातीआधी दिल्ली कॅपिटल्सने आपला नवीन कॅप्टन निवडला आहे. दुसऱ्याबाजूला सनरायजर्स हैदराबादने सुद्धा आपल्या नव्या कॅप्टनची निवड केली आहे.

Rishabh Pant च्या जागी दिल्ली कॅपिटल्सने निवडला नवीन कॅप्टन, अक्षर पटेल उपकर्णधार
Rishabh-pantImage Credit source: IPL
| Updated on: Feb 23, 2023 | 3:17 PM
Share

नवी दिल्ली : IPL 2023 ची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. नव्या सीजनच्या सुरुवातीआधी दिल्ली कॅपिटल्सने आपला नवीन कॅप्टन निवडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 16 व्या सीजनसाठी डेविड वॉर्नर दिल्ली टीमच नेतृत्व करणार आहे. ऋषभ पंतच्या जागी डेविड वॉर्नरची नियुक्ती करण्यात आलीय. डेविड वॉर्नरने याआधी सनराजर्स हैदराबादच नेतृत्व केलय. डेविड वॉर्नरने आपल्या नेतृत्वाखाली सनरायजर्स हैदराबादच्या टीमला चॅम्पियन बनवलं होतं. हैदराबाद टीम 2016 साली आयपीएल चॅम्पियन बनली होती.

अक्षर पटेल उपकर्णधार

सनरायजर्स हैदराबादच्या टीमने मागच्या सीजनआधी डेविड वॉर्नरला रिलीज केलं. त्यानंतर वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. डेविड वॉर्नर आता दिल्लीच्या टीमच नेतृत्व करणार आहे. तेच ऑलराऊंडर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.

सनरायजर्स हैदराबादने निवडला नवीन कॅप्टन

मागच्यावर्षी ऋषभ पंतच्या कारचा अपघात झाला. ऋषभ पुढचे काही महिने क्रिकेटच्या मैदानावर परतू शकणार नाहीय. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला आपला कॅप्टन बदलावा लागलाय. ऋषभ पंतच्या कारला मागच्यावर्षी 30 डिसेंबरला दिल्ली-डेहराडून हायवेवर अपघात झाला होता. दुसऱ्याबाजूला सनरायजर्स हैदराबादने सुद्धा आपल्या नव्या कॅप्टनची निवड केली आहे. हैदराबादने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामला आपला कॅप्टन बनवलं आहे. याआधी केन विलियमसन कॅप्टन होता.

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?