Delhi Capitals : पृथ्वी शॉला प्लेइंग 11 मध्ये स्थान का मिळत नाही? सौरव गांगुलीने सांगितलं कारण

दिल्ली कॅपिटल्स संघात पृथ्वी शॉचं एक स्थान होतं. मात्र मागच्या पर्वापासून पृथ्वी शॉचे तारे फिरले आहेत. टीम इंडिया असो की दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायसी वारंवार डावललं जात आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉ फेल गेला होता. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणंही कठीण झालं आहे. सौरव गांगुलीने त्यामागचं कारण सांगितलं आहे.

Delhi Capitals : पृथ्वी शॉला प्लेइंग 11 मध्ये स्थान का मिळत नाही? सौरव गांगुलीने सांगितलं कारण
पृथ्वी शॉला प्लेइंग 11 मध्ये स्थान का मिळत नाही? सौरव गांगुलीने सांगितलं कारण
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 9:17 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स सुरुवात पराभवाने झाली. मात्र संघाला पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आणण्यासाठी कर्णधार ऋषभ पंत तयारीला लागला आहे. असं असताना मागच्या पर्वात ओपनिंगला येणारा पृथ्वी शॉला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणंही कठीण झालं आहे. सलामीला येणाऱ्या पृथ्वी शॉला डावललं जात असल्याची भावना त्याच्या चाहत्यांमध्ये आहे. कारण डेविड वॉर्नरसोबत सलामीला मिचेल स्टार्क उतरतो. राजस्थान विरुद्धच्या सामन्यातही तसंच चित्र आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायसीवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर चाहते राग व्यक्त करत असताना सौरव गांगुलीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “पृथ्वी शॉ टीममध्ये तर आहे, पण त्याला मधल्या फळीत खेळवता येणार नाही.” पृथ्वी शॉने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये ओपनिंगच केली आहे. त्यामुळे त्याला मिडल ऑर्डरमध्ये खेळवणं कठीण आहे. त्याच्या ऐवजी संघात 27 वर्षीय रिकी भुईला संधी दिली जात आहे. त्याने रणजी ट्रॉफीत चांगला फॉर्म दाखवला आहे.

“पृथ्वी शॉ ओपनर आहे. आम्ही मार्श आणि वॉर्नरला ओपनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रिकी भुई मिडल ऑर्डर फलंदाज आहे. तो कोणत्याही स्थानावर फलंदाजी करू शकतो. भुईसाठी असं काही झालं नाही. पण आमच्याकडे ओपनिंगसाठी एक चांगली जोडी आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी चांगली ओपनिंग केली आहे. त्यामुळेच आम्ही तसा निर्णय घेतला आहे.”, असं सौरव गांगुली यांनी सांगितलं. “दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफला पृथ्वी शॉ जखमी असल्याने आणि 2023-24 मध्ये मुंबई संघासोबत असलेल्या जबाबदारीमुळे ऑफ सिझनमध्ये हवं तसं काम करण्यासाठी वेळ मिळाला नाही.”, असंही गांगुली पुढे म्हणाला.

नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर ऋषभ पंत म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. दुसऱ्या डावात दव पडू शकते. एकाच फ्रँचायझीसाठी 100 सामने खेळणे चांगले वाटते, पण प्रत्येक खेळ माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आमच्या संघात दोन बदल आहेत. इशांत बरा झालेला नाही, तर शाई होपच्या पाठीत दुखापत झाली आहे. त्यांच्या ऐवजी एनरिक नॉर्टजे आणि मुकेश कुमार यांना संघात घेतलं आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान.

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.