श्रीलंकेत असूनही टीम इंडियाचे हे सहा खेळाडू करताहेत वेगळी प्रॅक्टिस, नेमकं असं का? ते जाणून घ्या

भारत आणि श्रीलंका यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील सलग दोन सामने जिंकून भारताने मालिका खिशात घातली आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वात एक चांगली सुरुवात झाली आहे. आता पुढच्या मिशनसाठी सहा खेळाडू वेगळा सराव करत असल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीलंकेत असूनही टीम इंडियाचे हे सहा खेळाडू करताहेत वेगळी प्रॅक्टिस, नेमकं असं का? ते जाणून घ्या
| Updated on: Jul 29, 2024 | 4:59 PM

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून टी20 आणि वनडे मालिका असणार आहे. यापैकी टी20 मालिकेचा निकाल लागला असून तिसरा सामना औपचारिक असणार आहे. भारतीने आतापर्यंत खेळलेल्या दोन टी20 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच तीन सामन्यांची टी20 मालिका 2-0 जिंकली आहे. तिसरा टी20 सामना 30 जुलैला होणार आहे. असं असताना भारताच्या सहा खेळाडूंना वेगळी प्रॅक्टिस करत आहेत. गौतम गंभीरच्या पुढच्या मिशनसाठी आता सहा खेळाडूंचा सराव सुरु झाला आहे. कारण 2 ऑगस्टपासून भारतीय संघ वनडे मालिका खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली आणि इतर खेळाडू कोलंबोत पोहोचले आहेत. माहितीनुसार टीम इंडियाने कोलंबोत सराव सुरु केला आहे. पल्लेकेले मैदानापासून 152 किमी दूर सराव सुरु आहे. टी20साठी सध्या संघ पल्लेकेलेमध्ये असून यात वनडे संघातील सहा खेळाडूंनी सराव सुरु केला आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली कोलंबोत पोहोचल्याचे फोटो समोर आले आहेत. हे दोन्ही खेळाडू टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर ब्रेकवर होते. दोघांनी इंग्लंडमध्ये सुट्ट्या घालवल्या आणि थेट कोलंबोत पोहोचले आहेत. रोहित शर्मासोबत विराट कोहली, श्रेयस अय्यल, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि केएल राहुल सराव करत आहे. नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व खेळाडू पहिल्यांदा खेळणार आहेत. श्रेयस अय्यर आणि हर्षित राणा यांनी आयपीएलमध्ये गंभीरच्या मार्गदर्शनात केकेआरसोबत खेळले आहेत.

टी20 मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका असणार आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली दुसरं मिशन असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दृष्टीने आतापासून पायाभरणी केली जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्माकडे नेतृत्व असणार आहे. पहिला वनडे सामना 2 ऑगस्टला, दुसरा वनडे सामना 4 ऑगस्टला आणि तिसरा वनडे सामने 7 ऑगस्टला होणार आहे. हे तिन्ही सामने कोलंबोत होणार आहेत.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, हार्षित राणा, खलील अहमद, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रियान पराग