Kishori Shahane Car Accident: हे खूप मोठे नुकसान आहे; अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात
Kishori Shahane car accident: अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अपघाताविषयी माहिती दिली आहे. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून किशोरी शहाणे ओळखल्या जातात. नुकताच किशोरी शहाणे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी संताप देखील व्यक्त केला आहे. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया…
नेमकं काय झालं?
किशोरी शहाणे या घरातून शुटिंगसाठी निघाल्या होत्या. सकाळी सर्वत्र ट्राफिक असते. प्रवास करत असताना किशोरी शहाणे यांच्या गाडीला दुसऱ्या गाडीचा जोरात धक्का लागला. त्यामुळे किशोरी शहाणे यांच्या गाडीच्या उजव्या बाजूचा आरसा पूर्णपणे तुटला. सुदैवाने यामध्ये कोणालाही हानी झालेली नाही. केवळ किशोरी शहाणे यांच्या गाडीचा आरसा तुटला आहे. मात्र हा आरसा तुटल्यामुळे त्यांना गाडी चालवण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
वाचा: सचिन पिळगावकर आणि माझे अफेअर…; 43 वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
View this post on Instagram
काय म्हणाल्या किशोरी शहाणे?
किशोरी शहाणे यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत नेमकं काय घडलं हे सांगितले आहे. “सगळ्यांनाच पुढे जाण्याची घाई असते मलाही असते. पण तुम्ही असंवेदनशील कसे असू शकता? कोणाच्यातरी गाडीचा साईड मिरर तुटेल याकडे साधं तुमचं लक्षदेखील नाही. आता मला त्या व्यक्तीचा खूप राग येत आहे. झालेल्या या नुकसानामुळे तुमचा वेळ, पैसा तर जातातच पण मानसिक त्रासदेखील होतो. कृपया इतरांच्या नुकसानाबद्दल थोडी संवेदनशीलता दाखवता. आपल्यामुळे इतरांचं नुकसान करणं हे काही योग्य नाही. आता दुरूस्तीसाठीही माझ्याकडे वेळ नाही. आपली चूक नसताना हा अनावश्यक ताण वाढला आहे” असे किशोरी शहाणे व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
किशोरी शहाणे यांच्या कामाविषयी
किशोरी शहाणे यांनी एकेकाळी मराठी फिल्म इंडस्ट्रीवर राज्य तेसे होते. त्यांनी ‘मोरूची मावशी’ या नाटकातून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी माहेरची साडी, वाजवा रे वाजवा, एक डाव धोबी पछाड, नवरा माझा नवसाचा, रेड : द डार्क साईड, घर एक मंदिर, जस्सी जैसी कोई नही, सिंदूर अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सध्या त्या एका हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.
