मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना किती जागा मिळणार? आकडाच आला समोर; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ
मुंबई महापालिकेत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने दोन्ही भावांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट भाकीत करूनच खळबळ उडवून दिली आहे.
मुंबई महापालिकेत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने दोन्ही भावांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट भाकीत करूनच खळबळ उडवून दिली आहे. मी संख्या सांगण्यांमध्ये माहीर मानला जातो. त्यामुळे भाजपाच्या किती जागा येणार हे मी कानात सांगेन पण, मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 45 आणि राज ठाकरे यांच्या मनसेला 20 जागा मिळतील, पुढे गाडी बंद, असं भाकीत भाजपचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलं आहे. तसेच महापौर करायला निघालेल्या 11 जागा लढवणाऱ्यांना फक्त एक किंवा दोन जागा मिळतील, असा खोचक टोला चंद्रकांतदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला लागवला आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन निवडणूक लढवावी; राऊतांचा निशाणा
भाजपच्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली अन् भर सभेत नको ते बोलून गेले
मुंबईत ठाकरे बंधूंना किती जागा मिळणार? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ
“लाव रे तो व्हिडीओ” म्हणत फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर सभेत थेट हल्लाबोल

