आमिर खानला त्याच्याच घरातून बॉडीगार्ड्सने धक्के देऊन बाहेर काढले, व्हिडीओ व्हायरल, नेमकं कारण काय?
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानला त्याच्याच घरातून बॉडीगार्ड्सने धक्के देऊन बाहेर काढलं आहे. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Bollywood Actor Aamir Khan Video : बॉलिवूड अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. दोन घटस्फोटांनंतर आमिर खानने त्याच्या नवीन गर्लफ्रेंडबाबत खुलासा केला होता. दोघे अनेकदा सार्वजानिक ठिकाणी देखील दिसले. गेल्या 1 वर्षांपासून ते दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र, अशातच आता आमिर खान पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या सविस्तर
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतत आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘हॅपी पटेल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र, हा टीझर इमरान खानपेक्षा वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
आमिर खानला घराबाहेर काढल्याचा व्हायरल व्हिडिओ
‘हॅपी पटेल’च्या टीझरमधील एक खास क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमिर खानसारखा दिसणारा व्यक्ती स्वतःची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. तो सतत ‘मी आमिर खान आहे’ असे सांगतो आहे. मात्र, त्याचे बॉडीगार्ड्स तसेच अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन वीर दास त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. अखेर, बॉडीगार्ड्स त्याला धक्के मारत त्याच्याच घरातून त्याला घराबाहेर काढतात. हा संपूर्ण प्रसंग पाहून प्रेक्षक एकीकडे हसत आहेत तर दुसरीकडे गोंधळूनही जात आहेत.
सुनील ग्रोवरची नक्कल
या व्हिडीओमध्ये आमिर खानच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता म्हणजे लोकप्रिय कॉमेडियन सुनील ग्रोवर. सुनील ग्रोवरने आमिर खानची इतकी परफेक्ट नक्कल केली आहे की, कोणीही त्याला पहिल्यांदा बघेल तर तो खरा आमिर खानच आहे असे वाटते. त्याचे बोलणे, बोलण्याची पद्धत आणि हावभाव इतके परफेक्ट आहेत की वीर दास आणि बॉडीगार्ड्ससुद्धा गोंधळून जातात. सोशल मीडियावर प्रेक्षक सुनील ग्रोवरच्या अभिनयाचं भरभरून कौतुक करत आहेत.
व्हिडीओवर आमिर खानची प्रतिक्रिया
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये सुनील ग्रोवरचा अभिनय पाहून आमिर खानसुद्धा त्याचा फॅन झाला. आमिर खानने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुनील ग्रोवरच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. त्यामुळे आता इमरान खानचा ‘हॅपी पटेल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
