AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 | CSK साठी वाईट बातमी, एमएस धोनीच्या टीमला बसू शकतो मोठा झटका

IPL 2024 ची सुरुवात 22 मार्चपासून होत आहे. चेन्नई सुपर किंग्स पहिला सामना खेळणार आहे. गतविजेते म्हणून सीएसकेची पहिली मॅच असेल. पण चेन्नईसाठी सीजन सुरु होण्याआधी एक वाईट बातमी आहे. ज्याचा मोठा फटका त्यांना संपूर्ण सीजनमध्ये बसू शकतो.

IPL 2024 | CSK साठी वाईट बातमी, एमएस धोनीच्या टीमला बसू शकतो मोठा झटका
MS Dhoni
| Updated on: Mar 04, 2024 | 9:12 AM
Share

IPL 2024 | IPL 2024 साठी चेन्नई सुपर किंग्सचा कॅम्प सुरु झाला आहे. 17 व्या सीजनमध्ये पुन्हा विजेतेपद मिळवण्यासाठी CSK च्या खेळाडूंनी तयारी सुरु केली आहे. या दरम्यान CSK साठी एक चांगली बातमी नाहीय. चेन्नई सुपर किंग्सची चिंता वाढू शकते. सीएसकेचा एक प्रमुख खेळाडू 17 व्या सीजनमधून बाहेर होऊ शकतो. दुखापत आणि सर्जरी हे बाहेर होण्यामागे कारण असू शकतं. IPL 2024 चा पूर्ण नाही, पण निम्मा सीजन कदाचित हा खेळाडू CSK टीममध्ये दिसणार नाही. IPL 2024 च्या सीजनमध्ये धोनी आणि सीएसकेला ज्या खेळाडूची कमतरता जाणवेल, त्याच नाव डेवन कॉनवे आहे.

डेवन कॉनवे CSK साठी डावाच्या सुरुवातीला पाया रचण्याच काम करतो. ऋतुराज गायकवाडसोबत सलामीला येऊन धुवाधार बॅटिंग ही कॉनवेची ओळख आहे. आगामी आयपीएल सीजनमध्ये धोनीला ऋतुराजसोबत नवीन ओपनिंग पार्ट्नर शोधावा लागू शकतो. कदाचित डेवन कॉनवे या सीजनमध्ये खेळताना नाही दिसणार.

असं काय झालय की, नाही खेळणार

डेवन कॉनवेसोबत असं काय झालय की, ज्यामुळे तो आयपीएल 2024 मध्ये खेळताना नाही दिसणार?. याच कारण आहे, त्याच्या अंगठ्याला झालेली दुखापत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात डेवन कॉनवेच्या अंगठ्याच ऑपरेशन होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीजमध्ये त्याला ही दुखापत झाली होती.

रिकवरीसाठी किती वेळ लागणार?

वेगवेगळे स्कॅन आणि स्पेशलिस्ट डॉक्टरच्या सल्ल्यावरुन डेवन कॉनवेच्या अंगठ्याची सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्जरीनंतर रिकवरीसाठी कमीत कमी 8 आठवडे म्हणजे दोन महिन्यांचा वेळ लागेल. याचा अर्थ IPL 2024 च्या निम्म्यापेक्षा जास्त सीजनला तो मुकू शकतो.

डेवन कॉनवे यंदाच्या सीजनमध्ये खेळणार नाही, या बद्दल अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. इंजरी आणि सर्जरीनंतर रिकवरीला जो वेळ लागेल, त्या बद्दलचा हा आमचा अंदाज आहे. त्याच्या दुखापतीबद्दल समजल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वेलिंग्टन टेस्टमधून त्याला बाहेर ठेवण्यात आलं होतं. कॉनवे क्राइस्टचर्च येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये खेळणार, असं बोलल जात होतं. पण दुखापतीमुळे ते शक्य नाहीय.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!