AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 | आयपीएलमधील ‘या’ टीमच्या क्रिकेटपटूचा भीषण बाईक अपघात, स्पर्धा सुरु होण्याआधीच झटका

IPL 2024 | एकदा या क्रिकेटरच्या वडिलांची महेंद्रसिंह धोनी बरोबर भेट झाली होती. त्यावेळी धोनीने त्याच्या वडिलांना शब्द दिला होता की, आयपीएल 2024 च्या लिलावात रॉबिनला कोणी विकत घेतलं नाही, तर चेन्नई सुपर किंग्स त्याला विकत घेईल.

IPL 2024 | आयपीएलमधील 'या' टीमच्या क्रिकेटपटूचा भीषण बाईक अपघात, स्पर्धा सुरु होण्याआधीच झटका
Robin minz bike accident
Updated on: Mar 04, 2024 | 8:06 AM
Share

IPL 2024 | आयपीएल 2024 सुरु होण्याआधी एक वाईट बातमी आहे. आयपीएलमधील गुजरात टायटन्सच्या युवा खेळाडूच्या बाईकला अपघात झाला आहे. हा क्रिकेटपटू आपल्या कावासाकी सुपरबाइकने जात होता. त्याचवेळी त्याच्या बाईकची दुसऱ्या बाईकबरोबर धडक झाली. त्याने बाईकवरील नियंत्रण गमावलं. हा युवा क्रिकेटपटू गुजरात टायटन्सच्या टीमचा भाग आहे. लिलालवामध्ये रॉबिन मिंज या युवा क्रिकेटरला गुजरात टायटन्सने विकत घेतलं होतं. रॉबिन आता 21 वर्षांचा आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलय.

एक चांगली बाब म्हणजे या अपघातात रॉबिनला गंभीर दुखापत झालेली नाही. त्याला किरकोळ दुखापत झालीय. पण त्याच्या बाईकच मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. मिंजच्या प्रकृतीला धोका नाहीय, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. बाईकच्या पुढच्या भागाच नुकसान झालय. मिंजच्या उजव्या गुडघ्याला मार लागलाय.

किती कोटींना विकत घेतलं?

रॉबिन मिंजचे वडिल रांची एअरपोर्टवर सिक्युरिटी गार्ड आहेत. एकदा त्यांची महेंद्रसिंह धोनी बरोबर भेट झाली होती. त्यावेळी धोनीने रॉबिनच्या वडिलांना शब्द दिला होता की, आयपीएल 2024 च्या लिलावात रॉबिनला कोणी विकत घेतलं नाही, तर चेन्नई सुपर किंग्स त्याला विकत घेईल. मिंजसाठी चेन्नई सुपर किंग्सने सुद्धा बोली लावली. त्यांनी 1.20 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. पण नंतर माघार घेतली. मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबादने सुद्धा रॉबिनसाठी बोली लावली होती. अखेरीस गुजरातने बाजी मारली. गुजरात टायटन्सने 3.60 कोटी रुपये मोजून रॉबिनला विकत घेतलय.

आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते

रॉबिने वडिल लष्करातून निवृत्त झाले आहेत. मुलाला आयपीएल टीमने विकत घेतल्याच समजल्यानंतर ते भावूक झाले होते. रॉबिनच्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. रॉबिन त्यावेळी आईला म्हणालेला की, आता रडण्याची गरज नाही. सर्वकाही ठिक होईल. आयपीएलने अनेक खेळाडूंच आयुष्य बनवलय. रॉबिन सुद्धा आयपीएल खेळून आपलं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करेल. आता दुखापतीमधून सावरुन मैदानावर पुनरागमन करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक
युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक.
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम.
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?.
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?.
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.