IND vs ENG | इंडिया-इंग्लंड पाचव्या कसोटीआधी मोठा धक्का, हा खेळाडू मुकणार?

India vs England 5th Test | इंडिया-इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. स्टार बॉलर हा दुखापतीमुळे पाचव्या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

IND vs ENG | इंडिया-इंग्लंड पाचव्या कसोटीआधी मोठा धक्का, हा खेळाडू मुकणार?
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 4:41 PM

धर्मशाला | टीम इंडिया विरुद्ध इंग्लड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा धर्मशालेत खेळवण्यात येणार आहे. हा सामना 7 ते 11 मार्च दरम्यान पार पडणार आहे. या पाचव्या सामन्यासाठी टीम इंडियात बदल करण्यात आले. दुखापतीमुळे केएल राहुल बाहेर पडला आहे. तर चौथ्या सामन्यात विश्रांती दिलेल्या जसप्रीत बुमराह याचं पुनरागमन झालं आहे. तर वॉशिंग्टन सुंदर याला रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी रिलीज करण्यात आलं आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीतील अव्वल स्थान कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. तर इंग्लंड विजयासह भारत दौऱ्याचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरेल. याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.

इंग्लंडचा खेळाडू ओली रॉबिन्सन याला पाचव्या सामन्यातून बाहेर बसावं लागू शकतं. रॉबिन्सने आतापर्यंत त्याच्या कसोटी कारकीर्दीत इंग्लंडसाठी 20 सामन्यांमध्ये 76 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र रॉबिन्सनला दुखापतीमुळे पाचव्या आणि भारत दौऱ्यातील अखेरच्या कसोटी सामन्यातून बाहेर व्हावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. ओली रॉबिन्सन याने चौथ्या कसोटीत 13 ओव्हरमध्ये 54 धावा लुटवल्या होत्या. मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही. तर रॉबिन्सन दुसऱ्या डावात बॉलिंगही टाकू शकला नाही. त्यामुळे रॉबिन्सनला दुखापत महागात पडू शकते.

रॉबिन्सनला नक्की कशाचा त्रास?

रॉबिन्सनला बॅटिंगदरम्यना कंबरेत त्रास जाणवला होता. या दुखापतीचा परिणाम थेट रॉबिन्सनच्या बॉलिंगवर झाला. रॉबिन्सनने या मालिकेत फक्त एकमेव सामना खेळला आहे. रॉबिन्सनची फिटनेस पाहता तो आता जवळपास पाचव्या कसोटीत खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.

टेस्ट सीरजसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, डॅनियल लॉरेन्स आणि गेस ऍटकिन्सन.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.