भारतीय गोलंदाजांच्या वादळी माऱ्यापुढे ‘तो’ मैदानावर तग धरुन उभा राहिला, अखेर सामना जिंकवून दिला

भारताने दिलेल्या 133 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांना फारसी चांगली कामगिरी करता आली नाही. पण तरीही श्रीलंकेच्या मधल्या फळीतील एका फलंदाजाच्या दणकेबाज कामगिरीने भारतीय गोलंदाजांना घाम फुटला.

भारतीय गोलंदाजांच्या वादळी माऱ्यापुढे 'तो' मैदानावर तग धरुन उभा राहिला, अखेर सामना जिंकवून दिला
भारतीय गोलंदाजांच्या वादळी माऱ्यापुढे 'तो' मैदानावर तग धरुन उभा राहिला

कोलंबो (श्रीलंका) : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी 20 सामना बुधवारी (29 जुलै) खेळवण्यात आला. हा सामना अंतिम समयी प्रचंड रोचक ठरला. भारताने दिलेल्या 133 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांना फारसी चांगली कामगिरी करता आली नाही. पण तरीही श्रीलंकेच्या मधल्या फळीतील फलंदाज धनंजया डि सिल्वा याने नाबाद 40 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांच्या वादळी माऱ्यापुढे तो तग धरुन मैदानावर खेळत राहिला. त्याच्यापुढे अखेर भारतीय गोलंदाजांची कामगिरी फिकी पडली आणि तो श्रीलंकेच्या विजयाला कारण ठरला.

सिल्वाच्या 34 चेंडूत नाबाद 40 धावा

धनंजया डि सिल्वा हा मैदानावर कुशाग्र बुद्धीने आणि संयमाने खेळला. त्याच्या डोळ्यादेखत बरोबरीचे सहकारी बाद होत असताना त्याने पाहिले. पण तो डगमगला नाही. तो शेवटपर्यंत लढत राहिला. सामन्याचा कोणताही तणाव न घेता तो मैदानात प्रखरपणे लढताना दिसला. त्याने 34 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. यामध्ये एक चौकार आणि एका षटाकाराचा समावेश आहे.

रंगतदार सामन्यात श्रीलंकेची बाजी

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी 20 सामना प्रचंड रंगतदार झाला. अटीतटीच्या या सामन्यात श्रीलंकेने अखेर भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवत सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. श्रीलंकेकडून धनंजया डि सिल्वा याने सर्वाधिक नाबाद 40 धावा केल्या. सिल्वा याची खेळीच आजच्या सामन्यासाठी निर्णायक ठरली. सिल्वा पाठोपाठ बिनोद भानुका याने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर भारतीय गोलंदाज कुलदीप यादव याने 2 तर भुवनेश्वर कुमार, चेतन साकारिया, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर यांनी प्रत्येक 1 विकेट घेतल्या.

श्रीलंकेचा नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारताचा खेळाडू कृणाल पांड्या याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर श्रीलंके विरुद्धचा दुसरा टी 20 सामना एकदिवस पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी (28 जुलै) हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने 133 धावांचे आव्हान दिलं. या आव्हान श्रीलंकेने 4 गडी राखत पूर्ण केलं.

मुख्य बातमी : अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेचा भारतावर 4 विकेट्सने विजय, सीरिज 1-1 ने बरोबरीत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI