6,6,6,6,6,6…! भारताचा आणखी एक युवराज, एका षटकात ठोकल्या 36 धावा Watch Video

दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचं हे पहिलंच पर्व आहे. या स्पर्धेत ऋषभ पंत, इशांत शर्मा या सारखे दिग्गज खेळाडू खेळत आहे. साउथ दिल्ली सुपरस्टार्स विरुद्ध नॉर्थ दिल्ली यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात प्रियांश आर्यची वादळी खेळी पाहायला मिळाली.

6,6,6,6,6,6...! भारताचा आणखी एक युवराज, एका षटकात ठोकल्या 36 धावा Watch Video
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 31, 2024 | 5:13 PM

सहा षटकार म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा कोणता खेळाडू येतो तर युवराज सिंग…युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा षटकार मारत एक विक्रम सेट करून ठेवला आहे. आता या विक्रमाचा पाठलाग करण्यासाठी चढाओढ लागली आहे. दिल्ली प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत असाच कारनामा पाहायला मिळाला. या स्पर्धेतील 23 वा सामना साउथ दिल्ली सुपर स्टार्स आणि नॉर्थ दिल्ली यांच्यात पार पडला. या सामन्यात साउथ दिल्ली सुपरस्टार्सचा ओपनर प्रियांश आर्यने वादळी खेळीचं दर्शन घडवून दिलं. या संघाने प्रथम फलंदाजी करताना टी20 क्रिकेटमध्ये 300 धावांचा पल्ला गाठत नवा विक्रम केला आहे. या सामन्यात साउथ दिल्ली सुपरस्टार्सने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. 23 वर्षांचा सलामीवीर प्रियांश आर्यने या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सहा चेंडूत सहा षटकार मारत आपल्या खेळीने लक्ष वेधून घेतलं आहे. इतकंच काय तर या स्पर्धेत त्याच्या नावावर दोन शतकांची नोंदही आहे.

नॉर्थ दिल्लीविरुद्ध खेळताना प्रियांश आर्यने मनन भारद्वाजला एका षटकात सहा षटकार मारले. संघाचं 12 वं षटक मनन भारद्वाजकडे सोपण्यात आलं होतं. या षटकाचा प्रत्येक चेंडू प्रियांशने सीमेपार फटकावला. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सहा चेंडूत सहा षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच या लीगमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. प्रियांश आर्यने 50 चेंडूंचा सामना केला आमि 120 धावांची वादळी खेळी केली. प्रियांशने 240 च्या स्ट्राईक रेटने 10 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 120 धावा केल्या. तसेच आयुष बडोनीसोबत दुसऱ्या गड्यासाठी 286 धावांची भागीदारी केली. या लीगमधील सर्वात मोठी भागीदारी आहे.

प्रियांशने दिल्ली प्रीमियर लीगच्या 15 व्या सामन्यातही अशीच आक्रमक खेळी केली होती. पुरानी दिल्ली 6 विरुद्ध 55 चेंडूत 107 धावा केल्या होत्या. प्रियांशने 194.55 च्या स्ट्राईक रेटने शतक ठोकलं होतं. यात 9 चौकार आणि 7 षटकार मारले होते. तर सेंट्रल दिल्लीविरुद्ध खेळताना 42 चेंडूत 88 धावा केल्या होत्या. यात 6 षटकार आणि 7 चौकार मारले होते.