What A Catch..! दिल्ली प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त कॅचचं दर्शन, कुंवर बिधुरीने पकडलेला झेल पाहा

दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत पुरानी दिल्ली 6 आणि साउथ दिल्ली सुपरस्टार हे दोन संघ आमनेसामने आहेत. या स्पर्धेची सुरुवात एकदम जबरदस्त झाली. कुंवर बिधुरीने पकडलेला झेल पाहून उपस्थित प्रत्येक जण आवाक् झाला आहे.

What A Catch..! दिल्ली प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त कॅचचं दर्शन, कुंवर बिधुरीने पकडलेला झेल पाहा
Image Credit source: video grab
| Updated on: Aug 17, 2024 | 9:33 PM

दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात झाली असून पहिलाच सामना पुरानी दिल्ली 6 आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्स यांच्यात होत आहे. साउथ दिल्ली सुपरस्टार्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार ऋषभ पंतचा संघ समोर असल्याने खेळाडूंवर दडपण असणार यात शंका नाही. कर्णधार आयुष बदोनीने नाणेफेक जिंकताच प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणं सोप जाईल, असं त्याचं म्हणणं होतं. पुरानी दिल्ली 6 कडून अर्पित राणा आणि मंजीत ही जोडी मैदानात उतरली. या दोघांनी आक्रमक सुरुवात करून दिली. पण तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मंजीतने उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण कुंवर बिधुरीने अप्रतिम झेल पकडला. हा झेल इतका जबरदस्त होता की मंजीतला विश्वासच बसला नाही. कारण कुंवरने उलटा धावत गेला आणि उडी घेत झेल पकडला.

पुरानी दिल्ली 6 संघाला 22 धावा असताना पहिला धक्का बसला. मंजीत 8 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. यावेळी त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. दिविज मेहराच्या गोलंदाजीवर पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर लेग बाय चौकार आला. तिसऱ्या चेंडूवर मंजीतने उत्तुंग षटकार मारला. चौथ्या चेंडूवर 2 धावा घेतला. पाचव्या चेंडूवर उत्तुंग फटका मारला. पण नशिबाने साथ दिली नाही आणि कुंवर बिधुरीने जबरदस्त झेल पकडला. सोशल मीडियावर या झेलचं कौतुक होत आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पुरानी दिल्ली 6 : अर्पित राणा, मंजित, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ललित यादव, शिवम शर्मा, वंश बेदी, केशव दलाल, मयांक गुसैन, आयुष सिंग ठाकुर, अंकित भदाना, प्रिंस यादव

साउथ दिल्ली सुपर स्टार्स : आयुष बदोनी (कर्णधार), प्रियांश आर्य, सुमित माथुर, तेजस्वी (विकेटकीपर), दिविज मेहरा, कुंवर बिधुरी, विजन पांचाल, दिग्वेश राठी, कुलदीप यादव, शुभम दुबे, सौरभ देसवाल.