WPL 2026 : पलटणची पराभवाची हॅट्रिक, दिल्लीकडून अचूक परतफेड, मुंबईवर 7 विकेट्सने मात
WPL 2026 Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women Match Result : दिल्ली कॅपिट्ल्स टीमने जेमीमाह रॉड्रिग्स हीच्या नेतृत्वात चौथ्या मोसमातील दुसरा सामना जिंकला आहे. दिल्लीने या विजयासह मुंबई विरूद्धच्या पराभवाची वसुली केलीय.

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत गतविजेत्या मुंबई इंडियन्सने पराभवाची हॅट्रिक पूर्ण करत एकूण चौथा सामना गमावला आहे. डब्ल्यूपीएल स्पर्धेतील चौथ्या मोसमातील 13 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्सने आमनेसामने होते. मुंबईने दिल्लीसमोर बडोद्यातील कोटांबीमधील बीसीए स्टेडियममध्ये 155 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने हे आव्हान कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्स हीच्या अर्धशतकाच्या जोरावर 6 बॉलआधी आणि 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. दिल्लीने 19 ओव्हरमध्येच हा सामना 7 विकेट्सने जिंकला. दिल्लीचा हा या मोसमातील एकूण दुसरा विजय ठरला. तसेच दिल्लीने या विजयासह मुंबई विरूद्धच्या गेल्या पराभवाची परतफेड केली. मुंबईने याआधी दिल्लीला 10 जानेवारीला 50 धावांनी लोळवलं होतं.
दिल्लीचा दुसरा विजय
दिल्लीच्या या विजयात 5 फलंदाजांनी प्रमुख योगदान दिलं. दिल्लीसाठी शफाली वर्मा आणि लिझेल ली या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघींनी 7.3 ओव्हरमध्ये 63 धावांची भागीदारी केली. त्यानंतर लेडी सेहवाग आऊट झाली. शफाली वर्मा हीने 24 बॉलमध्ये 6 चौकारांसह 29 धावा केल्या.
लिझेल ली हीची निर्णायक खेळी
लॉरा वोल्वार्ड्ट आणि लिझेल या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 21 रन्स जोडल्या. लिझेलने 28 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारसह 46 धावा केल्या आणि आऊट झाली. लिझेलने या खेळीसह दिल्लीच्या विजयाचा पाया रचला.
लिझेल आऊट झाल्यानंतर लॉरा आणि कॅप्टन जेमीमाह रॉड्रिग्स या दोघींनी 35 बॉलमध्ये 34 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर लॉरा 17 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर दिल्लीच्या 118 रन्स असताना आऊट झाली. लॉराने 17 धावांचं योगदान दिलं.
जेमीमाहची विजयी अर्धशतकी खेळी
त्यानंतर कॅप्टन जेमीमाह रॉड्रिग्स आणि मारिजान काप या जोडीने चौथ्या विकेटसाठी 17 बॉलमध्ये नॉट आऊट 37 रन्सची पार्टनरशीप करत दिल्लीला विजयी केलं. जेमीने 37 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्ससह नॉट आऊट 51 रन्स केल्या. तर मारिजानने नाबाद 10 धावा करत जेमीला चांगली साथ दिली. मुंबईसाठी अमनजोत कौर आणि वैष्णवी शर्मा या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
दिल्लीचा दुसरा विजय
Marizanne Kapp says that’s how you do it 😎@DelhiCapitals are back to winning ways 💙
A 7⃣-wicket victory over #MI 🥳
Updates▶️ https://t.co/GUiylordH6 #TATAWPL | #KhelEmotionKa | #DCvMI️ pic.twitter.com/ezuLsdAyk0
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 20, 2026
मुंबईची बॅटिंग
दरम्यान त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 154 धावाच करता आल्या. मुंबईसाठी कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने 41 धावांची खेळी केली. तर नॅट सायव्हर ब्रँट हीने अर्धशतक केलं. नॅटच्या या अर्धशतकामुळे मुंबईला 100 पार मजल मारता आली. नॅटने 45 बॉलमध्ये 6 फोर आणि 2 सिक्ससह नॉट आऊट 65 रन्स केल्या. त्या व्यतिरिक्त इतर कुणालाही 12 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. दिल्लीकडून श्री चरणी हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर मारिजान काप आणि नंदीनी शर्मा या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
