AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli vs Gautam Gambhir : भांडणामुळे गंभीरच इतक्या लाखांच, तर विराटच किती कोटीच नुकसान?

Virat Kohli vs Gautam Gambhir : विराट विरुद्ध गौतम वादात हरभजन कोणाच्या बाजूने बोलला? Watch Video. हरभजन सिंगने विराट कोहलीला एक सल्ला दिलाय.

Virat Kohli vs Gautam Gambhir : भांडणामुळे गंभीरच इतक्या लाखांच, तर विराटच किती कोटीच नुकसान?
IPL 2023 Virat kohli-Gautam Gambhir (1)Image Credit source: Twitter
| Updated on: May 02, 2023 | 2:37 PM
Share

नवी दिल्ली : विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी चर्चेच कारण त्याची फलंदाजी नाही, तर वाद आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध RCB ने मिळवलेल्या विजयानंतर विराट कोहली चर्चेत आहे. विराट कोहली या मॅचमध्ये LSG चा नवीन उल हक आणि गौतम गंभीरला भिडला. परिस्थिती इथपर्यंत आली की, अन्य़ खेळाडूंनी विराट आणि गंभीरला वेगळं केलं. दोघांवर कारवाई करण्यात आली असून 100 टक्के मॅच फी कापण्यात आली आहे. हरभजन सिंगने या मुद्यावर एक विधान केलय. हरभजन सिंग म्हणाला की, अशाच एका भांडणामुळे मला आजही लाज वाटते.

हरभजन सिंह आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणाला की, विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये जे काही झालं, ते क्रिकेटसाठी चांगलं नाहीय. 2008 साली हरभजन सिंग सुद्धा अशाच एका वादात अडकला होता. त्याने भांडण केलं होतं. ज्याची आजही हरभजनला लाज वाटते. हरभजनने त्यावेळी मॅचनंतर श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. श्रीसंतला मैदानातच रडू कोसळलं होतं. हरभजन सिंगला त्या सीजनमध्ये टुर्नामेंटमधून बाहेर करण्यात आलं होत.

हरभजन काय म्हणाला?

“हरभजन सिंगने आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केलाय. विराट कोहली एक लीजेंड महान खेळाडू आहे. त्याने अशा विषयांमध्ये पडू नये. जे काही विराट आणि गंभीरमध्ये झालं, ते क्रिकेटसाठी चांगलं नाहीय” असं हरभजन सिंग आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला.

पैशामध्ये तिघांच किती नुकसान झालं?

या वादावादीमध्ये अडकलेल्या तिन्ही खेळाडूंना मोठा दंड ठोठावला. विराट कोहलीला एका मॅचमध्ये एक कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम मिळते. त्याची पूर्ण मॅच फी कापली गेलीय. गौतम गंभीरच 25 लाखाच नुकसान झालय. तेच नवीन उल हकला 1.79 लाखाचा दंड ठोठावण्यात आलाय. वादाची बीज 10 एप्रिलला रोवली गेली

लखनौ आणि बँगलोरमधील वादाची बीज 10 एप्रिलला रोवली गेली होती. त्या मॅचमध्ये लखनौने लास्ट बॉलवर आरसीबीला हरवलं होतं. त्यानंतर टीमचा मेंटॉर गौतम गंभीरने आक्रमक सेलिब्रेशन केलं होतं. गौतम गंभीरने तोंडावर बोट ठेवण्याची कृती केली होती. आरसीबीने लखनौला हरवल्यानंतर त्यांनी सुद्धा हेच काम केलं. या दरम्यान नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांच्यात शाब्दीक वादावादी झाली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.