AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Duleep Trophy 2024 मध्ये ऋषभ पंतचा कॅप्टन गिलला गुलीगत धोका, पाहा व्हिडीओ

Rishabh Pant Viral Video : टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंतने सामन्यादरम्यान असं काही केलंय की कोणालाच हसू आवरणार नाही.

Duleep Trophy 2024 मध्ये ऋषभ पंतचा कॅप्टन गिलला गुलीगत धोका, पाहा व्हिडीओ
| Updated on: Sep 08, 2024 | 5:03 PM
Share

क्रिकेटच्या मैदानात कामय आपल्या काही उद्याोगांमुळे स्टार खेळाडू ऋषभ पंत चर्चेत राहतो. आयपीएल असो नाहीतर आंतरराष्ट्रीय सामना हा गडी काही त्याच्या सवयी सोडत नाही. आपल्या टीमसह विरोधी टीममधील खेळाडूंच्या खोड्या काढतो. दुलीप ट्रॉफीमध्ये ऋषभ पंतनेही असंच काहीसं केलं आहे. पंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पंतने नेमकं काय केलं जाणून घ्या.

दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये भारत अ विरुद्ध भारत ब दोन टीममध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात भारत ब टीमकडून ऋषभ पंत खेळतो.सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत अ टीमचा कॅप्टन शुबमन गिल खेळाडूंना गेमप्लॅन सांगत होता. त्यावेळी भारत अ टीममध्ये नसलेला पंतही त्यांच्या टीममध्ये गेला. त्यावेळी भारत अ संघाचे खेळाडू हे पांढऱ्या जर्सीमध्ये खेळत होते. परंतु पंत हा निळ्या जर्सीमध्ये असल्याचं काहीवेळात समोर आलं.

ऋषभ पंतने गुपचूप भारत अ टीमच्या ताफ्यात गेला आणि त्यांचा गेमप्लॅन ऐकला. सगळे बाजूला झाल्यावर गोलंदाज आवेश खान टाळी मारून हसत हसत तिथून निघून गेला. पंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंत हा कधीच शांत बसत नाही, नेहमी काहीना काही खोड्या करत असतो. महत्त्वाचं म्हणजे कॅप्टन गिललाही लक्षात आले नाही की पंत तिथे उपस्थित होता.

पाहा व्हिडीओ:-

इंडिया ए: शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, टिळक वर्मा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्र, शाश्वत रावत.

इंडिया बी: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, राहुल चहर, मुकेश कुमार, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.