AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामने कुठे पाहता येणार?

Duleep Trophy 2024 Live Streaming All Details : बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू हे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेबाबत सर्व काही जाणून घ्या

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामने कुठे पाहता येणार?
Duleep Trophy
| Updated on: Sep 02, 2024 | 8:27 PM
Share

बीसीसीआयच्या 2024-2025 देशांतर्गत हंगामाला दुलीप ट्रॉफी स्पर्धेपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा श्रीगणेशा 5 सप्टेंबरपासून होणार आहे. स्पर्धेत एकूण 4 संघ सहभागी होणार आहे. स्पर्धेत एकूण 6 सामने होणार आहेत. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध 1-1 सामना खेळणार आहे. स्पर्धेची सांगता 22 सप्टेंबरला होणार आहे. बीसीसीआयने यंदा अनकॅप्ड खेळाडूंना दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणं बंधनकारक केलं आहे. दुलीप ट्रॉफी आधी झोनल स्पर्धा होती. मात्र आता ही स्पर्धा नव्या फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. इंडिया ए,इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी अशा या 4 संघांची नावं आहेत. स्पर्धेबाबत इतर महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊयात.

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेला केव्हापासून सुरुवात होणार?

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेला गुरुवार 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार?

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील सामन्यांना सकाळी 9 वाजता सुरुवात होईल.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामने टीव्हीवर कुठे पाहता येणार?

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामने टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामने मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामने मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळतील.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन कुठे?

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन हे आंध्रप्रदेश येथील अंनंतपूर आणि बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

दुलीप ट्रॉफीचं वेळापत्रक

4 संघ आणि खेळाडू

इंडिया ए: शुबमन गिल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुश कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद , आवेश खान, विद्वाथ कावेरप्पा, कुमार कुशाग्र आणि शाश्वत रावत.

इंडिया बी: अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयसवाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी (फिटनेसवर अवलंबून), वॉशिंगटन सुंदर, नवदीप सैनी , यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चाहर, आर साई किशोर, एन जगदीसन (विकेटकीपर) आणि मोहित अवस्थी.

इंडिया सी: ऋतुराज गायकवाड़ (कॅप्टन), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, रितिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाल विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशु चौहान, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल (विकेटकीपर) आणि संदीप वॉरियर.

इंडिया डी: श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडीक्कल, इशान किशन (विकेटकीपर), रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर) आणि सौरभ कुमार.

आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला.
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.