AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mitchell Marsh | मिचेल मार्श याची शानदार एन्ट्री, 4 वर्षानंतर ठोकलं खणखणीत शतक

Ashes Series 2023 3rd Test Mitchell Marsh Century | मिचेल मार्श याने ऑस्ट्रेलिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी शतक ठोकलं. मार्शच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाला 250 पार मजल मारता आली.

Mitchell Marsh | मिचेल मार्श याची शानदार एन्ट्री,  4 वर्षानंतर ठोकलं खणखणीत शतक
| Updated on: Jul 07, 2023 | 6:05 PM
Share

लीड्स | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हेडिंग्ले लीड्समध्ये अ‍ॅशेस सीरिज 2023 मधील तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातून मिचेल मार्श याने 4 वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. मिचेल मार्श याने 4 वर्षांनंतर शानदार एन्ट्री घेत इंग्लंड विरुद्ध शतक ठोकलं. मार्शने 102 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. मार्शच्या कसोटी कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं. मार्शने एकूण 118 धावांची खेळी केली. मार्शने या खेळीत 17 चौकार आणि 4 सिक्स ठोकले.

मिचेल मार्श याचं शानदार शतक

ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग

दरम्यान मिचेल मार्श याच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 250 मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 263 धावा केल्या. मिचेल मार्श याच्याशिवाय एकालाही मोठी खेळी साकारता आली नाही.

ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर याने 4, उस्मान ख्वाजा याने 13, मार्नस लाबुशेन याने 21, 100 वी कसोटी खेळणाऱ्या स्टीव्हन स्मिथ याने 22, ट्रेव्हिस हेड याने 39, एलेक्स कॅरी 8, मिचेल स्टार्क 2, कॅप्टन पॅट कमिन्स 0 आणि टॉड मर्फी याने 13 धावा केल्या. तर स्कॉट बॉलँड झिरोवर नाबाद परतला.

इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यातून कमबॅक केलेल्या मार्क वूड याने सर्वाधिक 5 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला सुरंग लावला. तर ख्रिस वोक्स याने 3 आणि स्टुअर्ट ब्रॉड याने 2 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास केला.

त्यानंतर इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तोवर 19 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 68 धावा केल्या आहेत. जो रुट 19 आणि जॉनी बेयरस्टो 1 धावांवर नाबाद आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी इंग्लंड कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट विश्वाची बारीक नजर असणार आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड टीम प्लेईंग इलेव्हन

बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, ओली रॉबिन्सन आणि स्टुअर्ट ब्रॉड.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी, (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, स्कॉट बॉलँड आणि टॉड मर्फी.

Follow Us
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द