ENG vs IND 2nd T20I : भारतीय खेळाडूकडून मैदानात अपशब्दाचा वापर, कोणत्या खेळाडूला दिली शिवी? नेमका काय प्रकार? जाणून घ्या…

भारतीय संघ गोलंदाजी आणि इंग्लंडचा संघ फलंदाजी करताना अपशब्द वापरल्याचा प्रकार समोर आलाय. इंग्लंडच्या डावाचं चौथं ओव्हर सुरू होतं. यावेळी हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. याचवेळी एका खेळाडूचा आवाज कैद झाला.

ENG vs IND 2nd T20I : भारतीय खेळाडूकडून मैदानात अपशब्दाचा वापर, कोणत्या खेळाडूला दिली शिवी? नेमका काय प्रकार? जाणून घ्या...
भारतीय खेळाडूकडू मैदानात अपशब्दाचा वापर
Image Credit source: social
| Updated on: Jul 10, 2022 | 1:29 PM

नवी दिल्ली : एजबॅस्टन T20 मध्ये भारताने (Indiaइंग्लंडचा (England) 49 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. यातच क्रिकेट सामन्यात भारतीय खेळाडूने शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलंय. त्या खेळाडूचा आवाज माईकमध्ये कैद झाल्याचं हे प्रकरण आहे. ही शिवीगाळ कुणी केली किंवा अपशब्द कुणी वापरला हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यापूर्वी कालच्या सामन्यात काय झालं ते पाहुया. काल टीम इंडियाने साउथॅम्प्टनमध्ये यजमानांचा 50 धावांनी पराभव केला. दुसऱ्या T20 बद्दल बोलायचे झाले तर भारताने प्रथम फलंदाजी करताना रवींद्र जडेजाच्या नाबाद 46 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून नवोदित ग्लेसनने तीन तर ख्रिस जॉर्डनने चार बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण इंग्लिश संघ 121 धावांत गारद झाला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 2 बळी घेतले. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा सलग 14 वा सामना जिंकला आहे.

अपशब्दाचा वापर

भारतीय संघ गोलंदाजी आणि इंग्लंडचा संघ फलंदाजी करताना एक अपशब्द वापरल्याचा प्रकार समोर आलाय. इंग्लंडच्या डावाचं चौथं ओव्हर सुरू होतं. यावेळी हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. इंग्लंडकडून डेव्हिड मलान हा दहा चेंडूत आठ धावा आणि लिविंग्स्टन आठ चेंडूत पंधरा धावा बनवून खेळत होते. यावेळीचा हा किस्सा  घडला आणि तो प्रचंड चर्चेतही आलाय.

हार्दिक पांड्याच्या ओव्हरमध्ये काय झालं?

हार्दिक पांड्याच्या ओव्हरमध्ये रोहित शर्माचा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला. यामध्ये त्यानं अपशब्द वापल्याचं समोर आलंय. मात्र, हे अपशब्द कोणत्या खेळाडूसाठी वापरण्यात आले. याबाबत अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. यावरुन मॅचच्या दबावाचा अंदाज लावला जातोय. हा दबाव यासाठी देखील होता. कारण भारतानं जो स्कोर बनवला होता. तो इंग्लंडच्या बॅटिंग लाईन-अपकडे बघता इतका जास्त नव्हता, त्यातच दुसऱ्या आणि पहिल्या टी20 मध्ये चार विकेट घेणारा हार्दिक पांड्याही थोडा दिशाहीन दिसून आला.

भारताची सुरुवात कशी झाली?

कर्णधार रोहित शर्मासह यष्टिरक्षक ऋषभ पंतने भारताकडून डावाची सुरुवात केली. डावाच्या पहिल्याच षटकात डेव्हिड विलीच्या चौथ्या चेंडूवर रोहितला जेसन रॉयने झेलबाद केले आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून भारतीय कर्णधारानं जळजळीत मीठ चोळले. त्यानं पुन्हा डावाच्या तिसऱ्या षटकात षटकार मारून गोलंदाजाचे स्वागत केले तर पंतने त्याच षटकात दोन चौकार मारले. त्यानंतर दोघांनी मोईन अलीविरुद्ध चौकार मारले.