
इंग्लंडला टीम इंडियाकडून दुसऱ्या कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाने इंग्लंडचा 336 धावांनी धुव्वा उडवला. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यानंतर आता उभयसंघातील तिसरा सामना हा आज 10 जुलैपासून ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.त्याआधी 3 वाजता टॉस झाला.
पहिल्या आणि दुसऱ्या सामन्याप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही इंग्लंडच्याच बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. मात्र इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने दुसऱ्या सामन्यातील पराभवानतंर निर्णय बदलला. स्टोक्सने टीम इंडियाला संधी न देता स्वत: बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंग्लंडने कुठेतरी पराभवाचा धसका घेतल्याचं म्हटलं जात आहे.
इंग्लंडने पहिल्या दोन्ही सामन्यात टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं होतं. भारताने या दोन्ही सामन्यातील पहिल्या डावात अनुक्रमे 400 आणि 500 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडने या चुकीतून धडा घेत आता तिसऱ्या सामन्यात बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आता इंग्लंडचा हा निर्णय किती योग्य ठरतो? हे काही तासांतच स्पष्ट होईल.
दरम्यान इंग्लंड आणि टीम इंडिया दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1-1 बदल केला आहे. इंग्लंडने 9 जुलै रोजीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली होती. त्यानुसार जोश टंग याच्या जागी जोफ्रा आर्चर याचा समावेश करण्यात आला. जोफ्राचं यासह इंग्लंड कसोटी संघात 4 वर्षांनंतर कमबॅक झालं
तर दुसऱ्या बाजूला भारतानेही अपेक्षेप्रमाणे 1 बदल केला आहे. वर्कलोड मॅनजेमेंटनंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे प्रसिध कृष्णा याला डच्चू देण्यात आला आहे.
आला रे आला, बुमराह आला
Just one change for India but it’s massive 👊
Jasprit Bumrah returns to the playing XI for the Lord’s Test 🔥 #WTC27 | 📝 #ENGvIND: https://t.co/0NCkPJdBEk pic.twitter.com/Qu01oKIpl4
— ICC (@ICC) July 10, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर आणि शोएब बशीर.