
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना दुसऱ्या दिवसानंतर रंगतदार स्थितीत पोहचला आहे. यशस्वी जैस्वाल याने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसर्या डावात 52 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात 224 धावा केल्या. इंग्लंडने प्रत्युत्तरात झॅक क्रॉली याने केलेल्या 64 आणि हॅरी ब्रूक याच्या 53 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 247 धावा केल्या. इंग्लंडने अशाप्रकारे 23 धावांची नाममात्र आघाडी मिळवली. त्यानतंर भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 18 षटकांत 2 विकेट्स गमावून 75 धावा केल्या. भारताने केएल राहुल (7) साई सुदर्शन (11) यांच्या रुपात 2 विकेट्स गमावल्या. तर यशस्वी जैस्वाल आणि आकाश दीप ही जोडी नाबाद परतली. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
भारताने पहिल्या दिवसापर्यंत 6 विकेट्स गमावून 204 धावा केल्या होत्या. इंग्लंडने भारताला दुसऱ्या दिवशी 20 धावांच्या मोबदल्या झटपट 4 झटके देत 224 धावावंर गुंडाळलं. भारतासाठी करुण नायर याने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर गस एटकीन्सन याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. तर जोश टंग याने तिघांना बाद करत गसला चांगली साथ दिली.
इंग्लंडने पहिल्या डावात स्फोटक सुरुवात केली. झॅक क्रॉली आणि बेन डकेट या सलामी जोडीने वेगाने धावा केल्या. दोघांनी 6 पेक्षा अधिकच्या रनरेटने धावा केल्या. इंग्लंडने 7 व्या ओव्हरमध्येच 50 धावा पूर्ण केल्या. डकेट या दरम्यान उलटसुलट फटके मारत होता. आकाश दीपच्या बॉलिंगवर डकेट खूपदा वाचला. मात्र आकाशने डकेटचा टप्प्यात कार्यक्रम करत इंग्लंडला पहिला झटका दिला. डकेटने 43 धावा केल्या. झॅक क्रॉलीने सर्वाधिक 64 धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं आणि इंग्लंडला झटक्यावर झटके देत मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं.
ओव्हल कसोटी रंगतदार स्थितीत
Stumps on Day 2 at the Oval 🏟️
Yashasvi Jaiswal’s unbeaten half-century takes #TeamIndia to 75/2 in the 2nd innings and a lead of 52 runs 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWNayE#ENGvIND pic.twitter.com/uj8q4k9Q3H
— BCCI (@BCCI) August 1, 2025
ओली पोप याने 22 तर जो रुटने 29 धावा करत काही वेळ भारतीय गोलंदाजांचा सामना केला. मात्र मोहम्मद सिराज याने या दोघांना एलबीडब्ल्यू केलं. त्यानंतर सिराज आणि प्रसिधने इंग्लंडच्या काही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठू दिला. मात्र हॅरी ब्रूक याने एक बाजू लावून धरली. हॅरीने टी ब्रेकनंतर इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. हॅरीच्या रुपात इंग्लंडने नववी विकेट गमावली. हॅरीने 53 धावा केल्या. तर ख्रिस वोक्स याला खांद्याच्या दुखापतीमुळे बॅटिंगला येता आलं नाही. इंग्लंडने अशाप्रकारे पहिल्या डावात 247 धावा करत 23 ची आघाडी घेतली.