
क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना हा 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानात आयोजित करण्यात आला आहे. इंग्लंडने या अंतिम सामन्यासाठी 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हनची घोषणा करत आपण सज्ज असल्याचं जाहीर केलं आहे. इंग्लंडने या सामन्यात 1, 2 नाही तर तब्बल 4 बदल केले आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.
इंग्लंडने प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार बेन स्टोक्स याला उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे पाचव्या कसोटीत खेळता येणार नाही. त्यामुळे स्टोक्सच्या जागी उपकर्णधार ओली पोप इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.
स्टोक्स व्यतिरिक्त प्लेइंग ईलेव्हनमधून स्पिनर लियाम डॉसन, ब्रायडन कार्स आणि मॅचविनर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर या तिघांनाही बाहेर करण्यात आलं आहे. तर टीम मॅनेजमेंटकडून युवा फलंदाज जेकब बेथेल याचा समावेश करण्यात आला आहे. गस एटकीन्सन यालाही संधी देण्यात आली आहे. तर ऑलराउंडर जेमी ओव्हरटन याला संधी मिळाली आहे. जेमीचं अशाप्रकारे इंग्लंड प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 वर्षांनंतर कमबॅक झालं आहे. जेमीने जून 2022 साली न्यूझीलंड विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. त्यानंतर थेट 3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जेमीला संधी मिळाली आहे.
दरम्यान बेन स्टोक्स याच्या जागी जेकब बेथेल याचा समावेश करण्यात आलाय. जोफ्रा आर्चर याच्या जागी गस एटकीन्सन याला संधी मिळाली आहे. लियाम डॉसन याच्या जागी जेमी ओव्हरटन खेळणार आहे. तर ब्रायडन कार्स याला बाहेर करण्यात आल्याने जोश टंग खेळताना दिसणार आहे.
इंग्लंडकडून बदलांचा चौकार
Ben Stokes will miss out on the final Test of the series with a right shoulder injury ❌
And we’ve made four changes to our side 👇
— England Cricket (@englandcricket) July 30, 2025
पाचव्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टंग.