Ben Stokes : तो असा.., बेन स्टोक्सला पराभव जिव्हारी, सामन्यानंतर सिराजचं नाव घेत स्पष्टच म्हणाला

Ben Stokes On Mohammed Siraj Post Match Presentation : इंग्लंडचा नियमित कर्णधार बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे भारताविरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात खेळता आलं नाही. स्टोक्सच्या जागी ओली पोप याने इंग्लंडचं नेतृत्व केलं.

Ben Stokes : तो असा.., बेन स्टोक्सला पराभव जिव्हारी, सामन्यानंतर सिराजचं नाव घेत स्पष्टच म्हणाला
Ben Stokes Post Match Presentation
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 04, 2025 | 8:12 PM

भारतीय क्रिकेट संघाने केनिंग्टन ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात ऐतिहासिक आणि अविस्मरणीय विजय मिळवला. भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचं ओव्हान ठेवलं होतं. इंग्लंडला पाचव्या आणि अंतिम दिवशी विजयासाठी फक्त 35 धावांची गरज होती. मात्र मोहम्मद सिराज याने पाचव्या दिवशी 3 आणि प्रसिध कृष्णा याने 1 विकेट घेत इंग्लंडला 367 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने यासह हा सामना 6 धावांनी जिकंला. इंग्लंडला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी होती. मात्र सिराजने या सामन्यात एकूण 9 विकेट्स घेत इंग्लंडला विजयापासून दूर ठेवलं. भारताने यासह शुबमन गिल याच्या नेतृत्वातील पहिल्याच कसोटी मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली.

इंग्लंडला या सामन्यासह मालिका नावावर करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र सिराजने या सामन्यात 9 विकेट्स घेतल्या. तसेच भारताच्या इतर खेळाडूंनीही निर्णायक योगदान दिलं.इंग्लंडचा नियमित कर्णधार बेन स्टोक्स याला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला. स्टोक्सने सामन्यानंतर सिराजचं नाव घेतलं. स्टोक्सने सिराजने काय म्हटलं हे जाणून घेऊयात.

स्टोक्स सिराजबाबत काय म्हणाला?

“मला सिराजबद्दल नेहमीच खूप आदर आणि कौतुक वाटतं. देशासाठी खेळण्याचा अर्थ काय आहे याचे हे आणखी एक उदाहरण आहे. तो (सिराज) असा माणूस आहे जो सतत पुढे जात राहतो. सिराज त्याच्या टीमसाठी जे करतो त्याबद्दल खूप आदर आहे”, असं स्टोक्सने सिराजबाबत म्हटलं.

मोहम्मद सिराज ‘मॅन ऑफ द मॅच’

मोहम्मद सिराज याने या सामन्यात 9 विकेट्स घेत सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने फिरवला. जो रुट आणि हॅरी ब्रूक या दोघांनी दुसऱ्या डावात शतकी खेळी साकारली. इतकंच नाही तर दोघांनी चौथ्या विकेटसाठी 195 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडने 300 पार मजल मारली होती. त्यामुळे भारत या सामन्यात मागे पडला होता. मात्र सिराजने त्यानंतर इंग्लंडला झटके दिले. तसेच प्रसिधनेही सिराजला कमाल साथ दिली.

स्टोक्सने पाचव्या कसोटीनंतर काय म्हटलं?

प्रसिधने या डावात 4 विकेट्स घेतल्या. तर सिराजने दुसऱ्या डावात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. सिराजने त्याआधी पहिल्या डावात इंग्लंडच्या 4 फलंजाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. सिराजने अशाप्रकारे दोन्ही डावात एकूण 9 विकेट्स मिळवल्या. सिराजला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.