AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs ENGW : इंडिया-इंग्लंड लॉर्ड्स टेस्टसाठी टीम जाहीर, कॅप्टन कोण?

England vs India Womens Lords Test : इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात 10 जुलैपासून एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. या एकमेव सामन्यासाठी 15 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत. जाणून घ्या.

INDW vs ENGW : इंडिया-इंग्लंड लॉर्ड्स टेस्टसाठी टीम जाहीर, कॅप्टन कोण?
Season BallImage Credit source: Windies Cricket Facebook Page
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 18, 2026 | 9:03 PM
Share

वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत करुन सलग 2 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियासमोर तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 5-5 सामने खेळायचे आहेत. ए आणि बी या दोन्ही गटातील 2 अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. तर त्यातून 2 संघ अंतिम फेरीत पोहचतील. त्यानंतर वर्ल्ड कप विजेता संघ निश्चित होईल. अंतिम सामना हा 5 जुलै रोजी होणार आहे.

टीम इंडिया वुमन्स वर्ल्ड कपआधी इंग्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळली. तर वर्ल्ड कपनंतर उभयसंघात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना 10 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन हे लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या सामन्यासाठी 18 जून रोजी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. नॅट सायव्हर ब्रँट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे.

इंग्लंड-इंडियापैकी सरस कोण?

वुमन्स टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आतापर्यंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकूण 15 सामने खेळवण्यात आले आहेत. उभयसंघातील पहिला सामना हा 1986 साली खेळवण्यात आला होता. टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ राहिली आहे. भारताने या 15 पैकी 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने टीम इंडिया विरुद्ध फक्त एकमेव सामना जिंकला आहे. तर उभयसंघातील 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. दोन्ही संघांमध्ये शेवटचा कसोटी सामना हा 2023 साली खेळवण्यात आला होता. त्यानंतर आता 3 वर्षांनी कसोटीचा थरार रंगणार आहे.

1 सामना आणि 15 खेळाडू

टी 20i मालिकेत काय झालं?

दरम्यान इंग्लंड-इंडिया यांच्यात 28 मे ते 2 जून दरम्यान 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात आली होती. भारताने या मालिकेत विजयी सलामी दिली. मात्र त्यानंतर इंग्लंडने सलग 2 सामन्यांसह मालिका जिंकली.

इंडिया विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी वुमन्स इंग्लंड टीम : नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), टॅमी ब्युमॉन्ट, लॉरेन बेल, माइया बौचियर, एलिसा कॅप्सी, टिली कॉर्टीन-कोलमन, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फायलर, एमी जोन्स, हीदर नाईट, एम्मा लॅम्ब, ग्रेस पॉट्स, एली थ्रेलकेल्ड आणि मॅडी विलियर्स.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी