AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs NZ, 2nd Test : इंग्लंडला मालिका विजयाची संधी, न्यूझीलंड कमबॅक करणार?

England vs New Zealand 2nd Test : न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियमसन याने कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे आता इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत केनच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी दिली जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ENG vs NZ, 2nd Test : इंग्लंडला मालिका विजयाची संधी, न्यूझीलंड कमबॅक करणार?
England vs New Zealand TestImage Credit source: @englandcricket and @BLACKCAPS X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 16, 2026 | 11:21 PM
Share

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील ही 3 सामन्यांची कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळी अंतर्गत खेळवण्यात येत आहे. यजमान इंग्लंडने या मालिकेत बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात विजयी सलामी दिली. इंग्लंडने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या सामन्यात चौथ्याच दिवशी न्यूझीलंडला पराभूत केलं. इंग्लंडने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. आता उभयसंघातील दुसरा सामना हा 17 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना 17 ते 21 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

न्यूझीलंड इंग्लंडला रोखणार?

इंग्लंडला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडसाठी हा सामना करो या मरो असा आहे. न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा या सामन्यात चांगलाच कस लागणार आहे.

इंग्लंडचा कर्णधार बदलला

इंग्लंड या दुसऱ्या कसोटीत नियमित कर्णधार बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत जो रुट नेतृत्व करणार आहे. नाईट क्लब प्रकरणामुळे बेन स्टोक्स आणि गस एटकीन्सन या दोघांना टीमपासून दूर ठेवण्यात आलं आहे.

इंग्लंडकडून प्लेइंग ईलेव्हन जाहीर

इंग्लंडने या सामन्यासाठी सोमवारी 15 जून रोजी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली. इंग्लंडने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल केले आहेत. बेन स्टोक्स याच्या जागी जॉर्डन कॉक्स याचा समावेश करण्यात आला आहे. तर गस एटकीन्स याच्या जागी जोफ्रा आर्चर याचा समावेश केला गेला आहे. जॉर्डन कॉक्स आणि सोनी बेकर या दोघांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यूझीलंड इंग्लंडला सलग दुसरा सामना जिंकण्यापासून रोखत मालिकेत बरोबरी साधणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले