AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs NZ, 2nd Test : इंग्लंडकडून दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, तब्बल 4 बदल, दोघांचं पदार्पण

England Playing 11 Against New Zealand For 2nd Test : इंग्लंड न्यूझीलंड विरुद्ध सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याआधी इंग्लंडने आपल्या 11 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. जाणून घ्या

ENG vs NZ, 2nd Test : इंग्लंडकडून दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, तब्बल 4 बदल, दोघांचं पदार्पण
England Joe RootImage Credit source: England Cricket
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 15, 2026 | 10:10 PM
Share

इंग्लंड क्रिकेट टीम सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंडने लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत मालिकेत विजयी सलामी दिली. इंग्लंडने या विजयासह मालिका विजयाचा दावा मजबूत केलाय. इंग्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडला दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची सुवर्ण संधी आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा 17 जुलैपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये होणार आहे. या सामन्याच्या 48 तासांआधीच इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे.

जो रुट याच्याकडे नेतृत्वाची धुरा

इंग्लंडकडून न्यूझीलंड विरुद्ध दोघांचं पदार्पण होणार आहे. जॉर्डन कॉक्स आणि सोनी बेकर या दोघांचं कसोटी पदार्पण होणार आहे. तसेच नाईट क्लब वादानंतर गसन एटकीन्सन आणि नियमित कर्णधार बेन स्टोक्स या दोघांना दुसऱ्या कसोटीतून बाहेर करण्यात आलं आहे. त्यामुळे अनुभवी फलंदाज जो रुट हा दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेन स्टोक्स आणि गस एटकीन्सन हे दोघे इंग्लंडच्या मालिकेतील पहिल्या विजयानंतर जल्लोष करण्यासाठी गेले होते. तिथे या दोघांच्या अंगरक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात सध्या तपास सुरु आहे. त्यामुळे तपासापर्यंत स्टोक्स आणि एटकीन्सन या दोघांना टीमपासून दूर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा समावेश करण्यात आला आहे. तर रॉबिन्सन याला दुखापतीमुळे दुसर्‍या कसोटीतून बाहेर व्हावं लागलंय. मात्र जोफ्राच्या कमबॅकमुळे इंग्लंडच्या बॉलिंगला बुस्टर मिळाला आहे.

इंग्लंड 4 वेगवान गोलंदाजांसह खेळणार

फिरकीपटू शोएब बशीर याला बाहेर ठेवण्यात आलं आहे. इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. या चौघांमध्ये मॅथ्यू फिशर याचा समावेश आहे. मॅथ्यूचा हा दुसरा कसोटी सामना असणार आहे.

इंग्लंडच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण?

स्टोक्सच्या जागी कुणाला संधी?

दरम्यान बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत जो रुट नेतृत्व करणार असल्याचं स्पष्ट आहे. मात्र स्टोक्सच्या जागी कुणाला संधी दिलीय? हा प्रश्न चाहत्यांना पडलाय. स्टोक्सच्या जागी सातव्या स्थानी जॉर्डन कॉक्स खेळणार आहे.

न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, मॅथ्यू फिशर, एमिलियो गे, जेमी स्मिथ (विकेटकीपर) आणि जोश टंग.

Follow Us
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार