AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jason roy च्या तुफानी शतकानंतर इंग्लंडचा डाव गडगडला, 125 रन्समध्ये 10 विकेट

इंग्लंडची टीम मोठा विजय मिळवणार असं वाटत होतं. पण 20 व्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकन बॉलर्सनी जोरदार पुनरागमन केलं. त्यांनी इंग्लंडच्या फलंदाजीच कंबरड मोडलं.

Jason roy च्या तुफानी शतकानंतर इंग्लंडचा डाव गडगडला, 125 रन्समध्ये 10 विकेट
jason-roy
| Updated on: Jan 28, 2023 | 11:27 AM
Share

डरबन – दक्षिण आफ्रिकेने इंग्लिश ओपनर जेसन रॉयच्या तुफानी शतकावर पाणी फिरवलं. पहिल्या वनडेमध्ये जेसन रॉयने धमाकेदार बॅटिंग केली. इंग्लंडची टीम मोठा विजय मिळवणार असं वाटत होतं. पण 20 व्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकन बॉलर्सनी जोरदार पुनरागमन केलं. त्यांनी इंग्लंडच्या फलंदाजीच कंबरड मोडलं. दक्षिण आफ्रिकेने पहिली बॅटिंग केली. रासी वॅन डर डुसैच्या 111 धावांच्या बळावर 7 विकेट गमावून 298 धावा केल्या.

146 धावांची भागीदारी

लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लिश टीमकडून जेसन रॉय आणि डेविल मलानने जोरदार सुरुवात दिली. दोघांनी 146 धावांची भागीदारी केली. 19.2 ओव्हरमध्ये इंग्लंडने एकही विकेट गमावला नव्हता.

दक्षिण आफ्रिकेची टीम बॅकफूटवर होती

या मजबूत पार्ट्नरशिपमुळे दक्षिण आफ्रिकेची टीम बॅकफूटवर होती. त्यांचा पराभव होणार हे दिसत होतं. सिसांदा मगालाने 20 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर मलानला 59 रन्सवर आऊट करुन ही शतकी भागीदारी मोडीत काढली.

दक्षिण आफ्रिकेकडून कोणी विकेट काढल्या?

मलान आणि रॉयची भागीदारी तुटताच इंग्लंडचा डाव गडगडला. त्यानंतर संपूर्ण टीमने मिळून फक्त 125 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 125 रन्समध्ये इंग्लंडच्या 10 विकेट काढल्या. एकवेळी इंग्लंडची स्थिती 146/0 होती. ती टीम पूर्ण 50 ओव्हर सुद्धा खेळू शकला नाही. 44.2 ओव्हरमध्ये इंग्लंडची टीम 271 रन्सवर ऑलआऊट झाली. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिख नॉर्खियाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याशिवाय सिसांदाने 4, कागिसो रबाडाने 2 आणि तबरेज शम्सीने एक विकेट घेतली. जेसन रॉयने त्याच्या 113 धावाच्या इनिंगमध्ये 11 चौकार आणि 4 षटकार लगावले. त्याने आपलं 11 वी सेंच्युरी 79 चेंडूत पूर्ण केली.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ