ENG vs SA : दक्षिण आफ्रिका सलग दुसऱ्या विजयासह मालिका जिंकण्यासाठी सज्ज, इंग्लंडसाठी करो या मरो सामना, कोण जिंकणार?
England vs South Africa 2nd ODI Live Streaming : दक्षिण आफ्रिका या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडे सलग दुसर्या विजयासह मालिका जिंकण्याची संधी आहे.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने विजयी सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी 2 सप्टेंबरला इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर 7 विकेट्सने मात करत एकतर्फी विजय साकारला. इंग्लंडने यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दुसऱ्या सामन्यासह मालिका काबिज करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर इंग्लंड पिछाडीवर असल्याने त्यांना मालिकेत कायम राहण्यासाठी कोणत्याही स्थितीत सामना जिंकावा लागणार आहे. इंग्लंडसाठी दुसऱ्या सामन्यात करो या मरो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना केव्हा?
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना गुरुवारी 4 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना कुठे?
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 5 वाजता टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कोणत्या चॅनेल्सवर पाहता येणार?
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहता येईल.
दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय
दरम्यान दक्षिण आफ्रिकेने लीड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला. केशव महाराज याने 4 विकेट्स घेत इंग्लंडला झटपट गुंडाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 24.3 ओव्हरमध्ये 131 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने एडन मारक्रम याच्या स्फोटक खेळीच्या जोरावर झटपट विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने 20.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून विजयी आव्हान पूर्ण केलं.
दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मारक्रम आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीनेच दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित केला. मारक्रमने 55 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 13 फोरसह 86 रन्स केल्या. तर रायनने 31 धावा केल्या. तर इतरांनीही विजयात योगदान दिलं. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका सलग दुसरा विजय मिळवून मालिकेवर नाव कोरणार की इंग्लंड पहिल्या पराभवाची परतफेड करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
