ENGW vs SAW Live Streaming: इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार?

England vs South Africa Womens Semi Final T20 World Cup 2026 Live Match Score : वुमन्स टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार? याचं उत्तर येत्या काही तासात मिळणार आहे. या सामन्यात इंग्लंड-दक्षिण आफ्रिका एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.

ENGW vs SAW Live Streaming: इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार?
ENGW vs SAW Semi Final Preview
Image Credit source: Icc and England Cricket X Account
| Updated on: Jul 01, 2026 | 11:52 PM

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धेतील सर्वात यशस्वी असलेल्या ऑस्ट्रेलिया टीमने वेस्ट इंडिजला पराभूत करुन आठव्यांदा अंतिम फेरीत धडक दिली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत त्यांच्यासमोर कुणाचं आव्हान असणार? याची प्रतिक्षा लागून आहे. उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. शार्लोट डीन हीच्याकडे इंग्लंडच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर लॉरा वॉल्डवॉर्ट दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. या सामन्यातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल सामना गुरुवारी 2 जुलैला खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

दोन्ही संघांची कामगिरी

इंग्लंडने साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केलीय. इंग्लंडनेही ऑस्ट्रेलियाप्रमाणे साखळी फेरीतील पाचही सामने जिंकले आहेत. इंग्लंड साखळी फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये 10 गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान होती. तर दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीतील 5 पैकी 4 सामने जिंकले. मात्र आता उपांत्य फेरीत कोण जिंकतं हे महत्त्वाचं ठरणार आहे.

इंग्लंड पाचव्यांदा फायनलमध्ये धडक देणार?

दरम्यान इंग्लंडने 2009 साली टी 20I वुमन्स वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर अनेकदा वर्ल्ड कप ट्रॉफीने इंग्लंडला हुलकावणी दिली आहे. मात्र यंदा इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. इंग्लंडने 2009 मध्ये न्यूझीलंडला पराभूत करुन वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर इंग्लंडने 2012, 2014 आणि 2018 साली अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र इंग्लंडला तिन्ही वेळेस अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे आता इंग्लंडकडे कांगारुंचा हिशोब करण्याची संधी आहे. मात्र त्याआधी इंग्लंड दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us