ENG vs SL : कामिंदू मेंडीसचं शतक, इंग्लंडला विजयासाठी 205 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
England vs Sri Lanka 1st Test : श्रीलंकेने इंग्लंडला चौथ्या दिवशी विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं आहे. कोण जिंकणार पहिला सामना?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. हा सामना मॅनचेस्टर येथील एमीरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. श्रीलंकेने दुसऱ्या डावात 89.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 326 धावा केल्या. श्रीलंकेने 204 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 205 धावांचं आव्हान मिळालं आहे. श्रीलंकेकडून कामिंदु मेंडीस याने सर्वाधिक 113 धावा केल्या. तर विकेटकीपर बॅट्समन दिनेश चांदीमल याने 79 तर अँजलो मॅथ्यूज 65 धावांचं योगदान दिलं. तर इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि मॅथ्यू पॉट्स या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
कामिंदू, दिनेश चांदीमल आणि अँजलो या तिघांचा अपवाद वगळता श्रीलंकेकडून इतरांना काही खास करता आलं नाही. करुणारत्नेने 27, कॅप्टन धनंजया डी सिल्वा 11 आणि मिलन रथनायके याने 10 धावा केल्या. विश्वा फर्नांडो आणि निशान मदुशंका या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर असिथा फर्नांडो झिरोवर नॉट आऊट परतला. तर वोक्स आणि पॉट्स या दोघांचा अपवाद वगळता इंग्लंडकडून
गस ऍटकिन्सन याने दोघांना आऊट केलं. तर मार्क वूड आणि जो रुट या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
सामन्यात त्याआधी काय झालं?
दरम्यान श्रीलंकेने टॉस जिंकून पहिल्या डावात ऑलआऊट 236 धावा केल्या. इंग्लंडने प्रत्युत्तरात 85.3 ओव्हरमध्ये 358 धावा करुन 122 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून जेमी स्मिथ याने 111 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो याने 4 विकेट्स घेतल्या. तर प्रभात जयसूर्याने तिघांना मैदानाबाहेर पाठवलं. आता श्रीलंका 205 धावांचा बचाव करत विजय मिळवणार की इंग्लंड विजयी सलामी देणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून असणार आहे.
कोण जिंकणार पहिला सामना?
England picked up four wickets quickly to bowl Sri Lanka out, setting up an exciting finish 🔥#WTC25 | #ENGvSL 🔗: https://t.co/0ExdSzTtxp pic.twitter.com/rWM5kPs1iT
— ICC (@ICC) August 24, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो आणि मिलन रथनायके.