AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs SL: Joe Root ला रोखणं अवघड! लॉर्ड्समध्ये सलग दुसरं शतक, रेकॉर्ड्सची रांग

Joe Root Century Record: इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. रुटने दोन्ही डावात शतकी खेळी करत रेकॉर्ड्सची रांग लावली आहे.

ENG vs SL: Joe Root ला रोखणं अवघड! लॉर्ड्समध्ये सलग दुसरं शतक, रेकॉर्ड्सची रांग
joe root century lordsImage Credit source: England Cricket X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 31, 2024 | 10:30 PM
Share

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याला रोखणं अवघड होत चाललं आहे. जो रुटचा कसोटी क्रिकेटमध्ये धमाका सुरुच आहे. रुटने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे इतिहास रचला आहे. रुटने दुसऱ्या कसोटीत सलग दुसरं शतक ठोकलं आहे. रुटने पहिल्या डावातही सेंच्युरी केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या डावातही 121 बॉलमध्ये 10 चौकारांच्या मदतीने चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. जो रुटने डावातील 53 व्या ओव्हरमधील लहीरु कुमाराच्या दुसर्‍या बॉलवर चौकार मारुन शतक झळकावलं. रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 34 वं शतक ठरलं. रुटने या शतकी खेळीत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

जो रुट इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला. रुटने माजी फलंदाज एलिस्टर कूक याच्या 33 कसोटी शतकांचा विक्रम मोडला. तसेच रुट लॉर्ड्समध्ये इंग्लंडकडून एकाच सामन्यात 2 शतकं करणारा एकूण चौथा फलंदाज ठरला. रुटआधी मायकल वॉन याने 2004 साली ही कामगिरी केली होती. त्याआधी ग्रॅहम गूच (1990) आणि जॉर्ज हेडली यांनी (1939) मध्ये हा कारनामा केला होता. इतकंच नाही, तर रुट इंग्लंडकडून लॉर्ड्समध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रुटने याबाबत ग्रॅहम गूच यांना मागे टाकलं.

श्रीलंकेला विजयासाठी 483 धावांचं आव्हान

दरम्यान जो रुटला शतकानंतर फार काही करता आलं नाही. रुट दुसऱ्या डावात 121 बॉलमध्ये 10 फोरसह 103 रन्सवर आऊट झाला. इंग्लंडने रुटच्या या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात ऑलआऊट 251 धावा केल्या. तसेच इंग्लंडने पहिल्या डावात ऑलआऊट 427 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेला 196 धावांवर रोखलं. त्यामुळे इंग्लंडला 231 धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 483 धावांचं डोंगराएवढं आव्हान मिळालं आहे.

रुटचं शतकी जल्लोष

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा