IND vs ENG : दुसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंड संघावर संकट, ‘हा’ दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णीत सुटली. त्यामुळे दुसऱ्या कसोटी विजयासाठी दोन्ही संघ आपआपली रणनीती आखत आहेत.

IND vs ENG : दुसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंड संघावर संकट, 'हा' दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त
इंग्लंड कसोटी क्रिकेट संघ

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना अनिर्णीत सुटला. ज्यामुळे दोन्ही संघाना समान गुण देण्यात आले. त्यामुळे सध्या दोन्हीपैकी कोणताच संघ आघाडीवर नसून दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहे. अशा वेळी इंग्लंड  संघावर सामन्यपूर्वीच एक संकट कोसळले असून संघाचा सर्वात महत्वाचा खेळाडू स्टुवर्ट ब्रॉडला (Stuart Broad) दुखापत झाली आहे. ज्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकु शकतो.

ब्रॉडला मंगळवारी सरावादरम्यान दुखापत झाली. दुसरी कसोटी अगदी तोंडावर आली असताना ब्रॉडला दुखापत झाल्याने दुसऱ्या कसोटीत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मेडिकल टीमच्या माहितीनुसार ब्रॉड सामन्यात खेळण्याचा निर्णय़ दुसरी टेस्ट सुरु होण्यापूर्वी त्याची प्रकृती कशी असेल त्यावर घेतला जाईल. विशेष म्हणजे ब्रॉडसाठी हा त्याचा 150 वा कसोटी सामना आहे.

ब्रॉडच्या जागी मार्क वुड खेळू शकतो

जर स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या कसोटीसाठी खेळू शकला नाही. तर त्याच्या जागी  मार्क वुडला खेळवलं, जाऊ शकतो. यासोबतच इंग्लंडच्या 18 सदस्यीय संघात बेन स्टोक्सच्या जागी निवडलेलया क्रेग ओवर्टनलाही संधी दिली जाऊ शकते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने स्टुअर्टच्या दुखापतीवरील अपडेट मध्ये म्हटलंय की, ”लॉर्ड्स मैदानात वॉर्म अप करताना त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली. सध्या त्याची संपूर्ण तपासणी सुरु असून लवकरच त्याचे रिपोर्ट्सही मिळणार आहेत.”

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट (सामना अनिर्णीत)

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

हे ही वाचा

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

IND vs ENG : सामना अनिर्णीत सुटल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट म्हणतो, आणखी 40 ओव्हर मिळाले असते तर…

IND vs ENG : 24 तासांच्या खेळात सिराजची इंग्लंडच्या खेळाडूंशी दुसऱ्यांदा वादावादी, कोहलीच्या मध्यस्थीनंतर सिराज शांत, VIDEO

(England bowler stuart broad got an injury doubt for second test against india)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI