रोहित शर्माला आता पर्याय…रिटायरमेंटबाबत बड्या क्रिकेटरचं मोठं विधान, सांगितलं लोकांच्या मनात काय?

रोहित शर्मासाठी येणारे सहा आठवडे खूप महत्त्वाचे असणार आहेत. परंतु आयपीएलमध्ये त्याने खूप चांगले प्रदर्शन केलेले आहे. तो अजूनही जगातील सर्वश्रेष्ट फलंदाजांपैकी एक आहे, अशी स्तुती करायलाही ग्रीम स्वॉन विसरले नाहीत.

रोहित शर्माला आता पर्याय...रिटायरमेंटबाबत बड्या क्रिकेटरचं मोठं विधान, सांगितलं लोकांच्या मनात काय?
ROHIT SHARMA RETIREMENT
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 14, 2026 | 7:19 PM

Rohit Sharma Retirement : अफगाणिस्तानविरोधातील एकदिवसीय सामन्यांच्या श्रृंखलेतील पहिल्याच सामन्यात भारताचा विजय झाला आहे. भारताचे आता आफगाणिस्तानविरोधात आणखी दोन सामने होणार आहेत. दरम्यान आता भारताचे स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. कारण या सामन्यात रोहित शर्मा फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याची हीच खेळी लक्षात घेता आता रोहित पवारच्या खेळावर आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.

हे दोन्ही खेळाडू आता…

रोहित शर्मा आणि विरोट कोहली हे दोन्ही स्टार क्रिकेटपटू सध्या फक्त एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत खेळताना दिसतात. कसोटी क्रिकेट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून या दोघांनीही निवृत्ती घेतलेली आहे. अफगाणिस्ताननंतर भारत इंग्लंडविरोधात एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याआधीच इंग्लंडचे माजी फिरकीपटू ग्रीम स्वॉन यांनी विरोट आणि रोहित यांच्याविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. हे दोन्ही खेळाडू आता त्यांच्या करिअरच्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे आता त्यांच्या जागेवर नवा पर्याय शोधणे स्वाभाविक आहे, असे ग्रीम स्वॉन यांनी म्हटले आहे.

…तेव्हा लोक संबंधित खेळाडूच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध घेतात

जेव्हा एखादा खेळाडू करिअरच्या दुसऱ्या टप्प्यात असतो तेव्हा लोक संबंधित खेळाडूच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध घेतात. तुम्ही तुमच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असले तरीही लोक तुमच्यानंतर कोण असेल, असा प्रश्न विचारतातच. एक-दोन वेळा तुम्ही चांगला खेळ केला नाही की अशा प्रकारची चर्चा होते, असेही ग्रीम स्वॉन म्हणाले.

विराट कोहलीबद्दल नेमकं काय मत?

रोहित शर्मासाठी येणारे सहा आठवडे खूप महत्त्वाचे असणार आहेत. परंतु आयपीएलमध्ये त्याने खूप चांगले प्रदर्शन केलेले आहे. तो अजूनही जगातील सर्वश्रेष्ट फलंदाजांपैकी एक आहे, अशी स्तुती करायलाही ग्रीम स्वॉन विसरले नाहीत. त्यांनी भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यांविषयी भाष्य केले. भारत-इंग्लंड यांच्यात सामने खेळवले जातात तेव्हा ते मोठे सामने असतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं. रोहित पवार यांच्यासोबतच ग्रीम स्वॉन यांनी विराट कोहलीवरही मत व्यक्त केलेआहे. रोहित शर्माप्रमाणेच विराट कोहली हादेखील कोणत्याही खेळाडूसाठी खूप मोठं संकट असतो. तो आक्रमक खेळाडू आहे, असं ग्रीम स्वॉन म्हणाले.

Follow Us